रुस्तम', 'रेड' अन् 'बर्फी' आणि 'बादशाहो'' यासारख्या सिनेमात काम केलेली ही अभिनेत्री सध्या सिनेमातून गायब आहे. आम्ही बोलतोय अभिनेत्री इलियाना डिक्रूजबाबत. इलियाना प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत असते. गेल्या अनेक महिन्यांपासून इलियाना ऑस्ट्रेलियातील फोटोग्राफर अँड्रयूशी नीबॉनला डेट करत होती.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, एका इंटरव्हु दरम्यान इलियानाने पहिल्यांदा आपल्या ब्रेकअपवर बोलली आहे. ती म्हणाली, मी आतापर्यंत गप्प होते कारण दुसऱ्या व्यक्तिच्या खासगी आयुष्यबाबत बोलायला मला आवडत नाही. ज्यावेळी तुम्ही रिलेशनशीपमध्ये असतात तेव्हा एकटे नसतात. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीबाबत बोलाणं चांगले नाही. मी अँड्रयूच्या खासगी आयुष्याचा आदर करते.   


इलियाना काही दिवसांपूर्वी सेक्स लाईफबद्दल केलेल्या स्टेटमेंटला घेऊन चर्चेत आली होती. इलियाना शिबानी दांडेकरचा शो 'The Love Laugh Live Show'मध्ये म्हणाली होती की  , कदाचित माझ्या विधानाकडे चुकीच्या पद्धतीने पाहिलं गेलं. असं असू शकत की मी कोणाच्यातरी आणि विधानावर मत व्यक्त केलं असेल जे मला आवडलं असेल. त्यावर मी बोलले असेन की, मी सेक्स एन्जॉय करते आणि त्याच्याकडे वर्कआऊट म्हणून पाहते. मला हे योग्य वाटत नाही.

आपल्या या गोष्टींना विस्तारीतरित्या सांगताना इलियाना डिक्रुझ म्हणाली की, माझ्या म्हणण्याचा हा अर्थ आहे की, माझ्या मते सेक्स एन्जॉय केलं पाहिजे मात्र त्यामागे भावनादेखील असल्या पाहिजेत. जेव्हा तुमच्यात प्रेम असते तेव्हा सेक्स करणं चांगलं वाटतं. यात दोन आत्मा सहभागी होत असतात.


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, इलियाना लवकरच अनीस बाज्मीच्या 'पागलपंती' सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात इलियाना व्यतिरिक्त जॉन अब्राहम, अनिल कपूर, उर्वशी रौतेला आणि अरशद वारसी यांच्या भूमिका आहेत. सध्या सिनेमाचे काही भागाचे शूटिंग हे लंडनमध्ये सुरू आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचे प्लॅनिंग आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ileana dcruz speaks on breakup with ex boyfriend andrew kneebone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.