ileana Dcruz Asked a question on social media that the post caught everyone's attention | इलियानाने सोशल मीडियावर असा काय प्रश्न विचारला की, त्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष

इलियानाने सोशल मीडियावर असा काय प्रश्न विचारला की, त्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष

इलियाना डीक्रूजने 2006 पासून आपल्या करिअरला सुरुवात केली. 2012 मध्ये इलियानाने ‘बर्फी’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. 'रूस्तम', 'मैं तेरा हिरो', 'मुबारकाँ' अशा अनेक सिनेमांमध्ये ती दिसली आहे.मुळात इलियाना भारंभार काम करत नाहीत. कामाच्या बाबतीत ती चोखंदळ आहे. नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची वाहवाह ती मिळवत असते. सोशल मीडियावर ती सक्रीय असली तरी तिला जे वाटते त्यावरही ती आपली परखड आणि रोखठोक मतं मांडताना दिसते. सध्या तिने अशाच एका मुद्दा समोर आणला आहे.

नेहमीच हिरोला हिरोइनची गालच आकर्षक का वाटतात, Unfair n Lovey असा हॅशटॅग देत तिने पोस्ट शेअर केली आहे. मात्र या पोस्टने नेटीझन्सचे लक्ष वेधले आहे. इलियानाने विचारलेल्या प्रश्न चाहत्यांना इतका काय आवडला की ती फुल ऑन तिच्यावर फिदा झाले आहेत. इलियानाने समोर आणलेली बाब खरंच कौतुकास्पद असल्याची कमेंटस चाहते करत आहे. विशेष म्हणजे पोस्ट शेअर करत तिने तिच्या नव्या सिनेमाचं नावंही जाहीर केले आहे.

'अनफेयर अँड लवली' असं या तिच्या नवीन सिनेमाचे नाव आहे. या सिनमात इलियानासह रणदीप हुडाही झळकणार आहे.  बलविंदर सिंह जंजुआ यांनी सिनेमाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. सिनेमात इलियाना लव्हली नावाच्या मुलीची भूमिका साकारणार असून रणदीर हुडा पहिल्यांदाच विनोदी भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमाच्या टायटलवरून सिनेमाच्या कथा स्पष्ट होते.

हरियाणामधल्या एका सावळ्या मुलीची ही कथा असून आपल्या या रंगामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी गोष्ट आहे.  आता हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याबाबतची माहिती समोर आली नसली तरीही लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजतंय.

लॉकडाउनमध्ये बॉलिवूडच्या अभिनेत्रीचे झाले असे हाल, स्वतःच कापले स्वतःचे केस

लॉकडाऊन दरम्यान सतत सोशल मीडियावर ती सक्रीय असायची. मध्यंतरी  इलियानाने इंस्टाग्रामवर स्टोरीवर नवीन फोटो शेअर करत सांगितले की, तिने स्वतःच स्वतःचे केस कापलेत. यासोबतच तिने तिचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तिचे लांब केस दाखवताना दिसते आहे. लॉकडाउनमध्ये सगळं बंद असल्यामुळे सेलिब्रेटींनाच हेअरस्टायलिस्ट बनावे लागले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ileana Dcruz Asked a question on social media that the post caught everyone's attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.