ठळक मुद्दे या मुलाखतीत तिने बॉलिवूड डेब्यूबद्दलचाही खुलासा केला.

‘बर्फी’ आणि ‘रेड’सारख्या चित्रपटात शानदार अभिनय करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिचा नवा चित्रपट ‘पागलपंती’ उद्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, अनिल कपूर, उर्वशी रौतेला, क्रिती खरबंदा, पुलकित सम्राट, अर्शद वारसी अशी भलीमोठी स्टारकास्ट आहे. इलियाना दीड वर्षांनंतर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये वापसी करतेय. यापूर्वी 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या सिनेमात ती दिसली होती. या इलियानाची आणखी एक ओळख तुम्हाला ठाऊक आहे? होय, इलियाना स्वत: स्वत:ला ‘साऊथ सिनेमाची अक्षय कुमार’ म्हणते. ताज्या मुलाखतीत इलियाना यावर बोलली.


बॉलिवूडमध्ये येण्याआधी सहा वर्षे मी साऊथ सिनेमांत काम केले. एक काळ असा होता की, मी कुठलाही विचार न करता, येईल तो सिनेमा साईन करायचे. मी साऊथची अक्षय कुमार होती. अर्थात अक्षय उत्तम तेच सिनेमे स्वीकारतो. पण माझे काही सिनेमे चांगले असत काही वाईट. मी केवळ सिनेमे साईन करायचे. हे सिनेमे मी कशासाठी करतेय, हेही मला ठाऊक नव्हते, असे इलियानाने या मुलाखतीत सांगितले. 


त्या काळात साऊथ इंडस्ट्रीचा मला काहीही अंदाज नव्हता. इथे कसे काम होते, हेही मला ठाऊक नव्हते. पण एकदिवस अचानक मला साक्षात्कार झाला. आला तो सिनेमा स्वीकारायचा, हे आता जमायचे नाही, हे मला जाणवले आणि तेव्हापासून मी स्क्रिप्टवर लक्ष केंद्रीत केले, असेही तिने सांगितले.


या मुलाखतीत तिने बॉलिवूड डेब्यूबद्दलचाही खुलासा केला. तिने सांगितले की, मला सलमान खानचा ‘वॉन्टेट’ चित्रपट आॅफर झाला होता. हा चित्रपट मी स्वीकारला असता तर तो बॉलिवूडचा माझा डेब्यू सिनेमा ठरला असता. पण मी आॅफर नाकारली. कारण या चित्रपटासाठी ज्या दिवशी फोटोशूट होणार होते, त्यादिवशी माझी परिक्षा होती.

Web Title: ileana dcruz to act in pagalpanti says she was like south cinema akshay kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.