If you are working in Bollywood, do not fall into 'these' things, Sarah Ali Khan's advice | बॉलिवूडमध्ये काम करताय तर 'या' गोष्टींना बळी पडू नका,सारा अली खानचा सल्ला
बॉलिवूडमध्ये काम करताय तर 'या' गोष्टींना बळी पडू नका,सारा अली खानचा सल्ला

बॉलिवूडमध्ये कलाकार लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग असतात.ग्लॅमरस दिसण्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते. लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटसाठी प्लॅस्टीक सर्जरी करण्याकडे अनेक अभिनेत्रींचा कला असतो. अशी अनेक उदाहणं आहेत ज्यांनी प्लॅस्टीक सर्जरी करत आपला मेकओव्हर केला आहे. अनुष्का शर्मा, शिल्पा शेट्टी, श्रुती हसन, वाणी कपूर, कंगना रणौत, प्रियंका चोप्रा यांसारख्या अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केली आहे.तसेच जान्हवी कपूरनेही तिच्या बॉलिवूड डेब्युसाठी प्लॅस्टीक सर्जरीचा आधार घेत नवीन लूक मिळवला आहे. मात्र हीच बाब सारा अली खानला पटत नाही. प्लॅस्टीक सर्जरी मिळवलेला लूक त्यात कसलं आलं सौंदर्य असे ठाम मत सारा अली खानने मांडले आहे. बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर  रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करेन त्यासाठी प्लॅस्टीक सर्जरी कधीही करणार नसल्याचे तिने म्हटले आहे. 

साराने आधीपासून खूप मेहनती असल्याचे समोर आले आहे.  पूर्वी ती खूप लठ्ठ होती, तिचं वजनही नव्वदच्यावर होते. मात्र प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर साराने अशक्य ते शक्य करून दाखवले. सुरूवातीला साराचं वजन 96 किलो इतके होते. यावेळी आपल्याला अभिनेत्री बनायचे आहे अशी इच्छाही तिने आई अमृता सिंहकडे व्यक्त केली होती. त्यावेळी अमृता सिंह म्हणजे साराच्या आईने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. शिक्षण लवकर पूर्ण करून तिला अभिनेत्री व्हायचं होतं म्हणून पदवीच्या दोन वर्षाचं शिक्षण तिने एका वर्षात पूर्ण केलं. त्याच दरम्यान ती अमेरिकेला गेला होती. अमेरिकेत काय काय केलं याची कथा तिने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. अमेरिका असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, खाऊ शकता. कारण तिथे विविध चॉईस असतात असं सारानं सांगितलं. 

चॉकलेटसह तिथे सॅलड मिळते आणि पिझ्झासह प्रोटीनही मिळते. या सगळ्यांमुळेच ती अमेरिकेत असताना वाढलेले वजन कमी केले. याशिवाय वर्कआऊट आणि जीवनातील काही गोष्टी शिस्तीने फॉलो केल्याचे साराने सांगितले आहे. या सगळ्या कालावधीत आपण आपल्या आईशी म्हणजे अमृता सिंह हिच्याशी संपर्क साधला नव्हता असंही तिने आवर्जून सांगितले. मात्र शिक्षण पूर्ण करून अमेरिकेतून भारतात आली तोवर तिने आपला फोटोसुद्धा आईला दाखवला नव्हता असं साराने म्हटले आहे. मात्र विमानतळावर येताच आईने आपल्या सूटकेसमुळे ओळखल्याचे साराने सांगितले. तीस किलो वजन कमी केल्याप्रमाणे आपण वेगळेच दिसत होतो असं साराने सांगितले.


Web Title: If you are working in Bollywood, do not fall into 'these' things, Sarah Ali Khan's advice
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.