'I will be indebted to you for the rest of my life', Aishwarya Rai Bachchan became emotional after Corona was released | 'आयुष्यभर तुमची ऋणी राहीन', कोरोना मुक्त झाल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन झाली इमोशनल

'आयुष्यभर तुमची ऋणी राहीन', कोरोना मुक्त झाल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन झाली इमोशनल

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांशी संवाद साधला आहे. तिने कोरोनावर मात केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

ऐश्वर्या राय बच्चनने इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने म्हटले की, आराध्या, बाबा, अभिषेक आणि माझी तुम्ही जी काळजी घेतली, चिंता केली आमच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना केली त्या सगळ्यासाठी मनापासून खूप धन्यवाद. खरेच आयुष्यभर तुमचे हे उपकार माझ्यावर राहतील.

अभिषेक बच्चनने ट्विट केले की, तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना व आशीर्वादासाठी धन्यवाद. मी नेहमी तुमचा ऋणी राहिन. ऐश्वर्या व आराध्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे आणि त्यांना हॉस्पिटलमधून रजा मिळाली आहे. आता ते घरी राहणार आहेत. मी आणि वडील हॉस्पिटलमध्येच मेडिकल स्टाफच्या देखभालीत राहणार आहोत.

आता आराध्या व ऐश्वर्याला हॉस्पिटलमधून डिस्जार्च मिळाल्यावर अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले आहे. खरेतर त्या दोघींची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर अमिताभ बच्चन भावूक झाले आणि त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, माझी छोटी मुलगी आणि सूनेला हॉस्पिटलमधून रजा मिळाल्यावर माझे अश्रू थांबवू शकलो नाही. देवा तुझी कृपा अपार, अपरम्पार.

अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना वैद्यकीय देखरेखीखाली असून त्यांना याच आठवड्यात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. अभिषेक आणि अमिताभ यांना ११ जुलैला कोरोनाची लागण आली. यानंतर दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्या आणि आराध्या यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या दोघींना सुरुवातीला होम क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना १७ जुलैला नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'I will be indebted to you for the rest of my life', Aishwarya Rai Bachchan became emotional after Corona was released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.