ठळक मुद्देगेल्या वर्षी मीटू मुव्हमेंटमुळे अनेक स्त्रियांनी समोर येऊन लैंगिक शोषणाविषयी भाष्य केले होते. पण अनेक अभिनेत्रींनी याबाबत काहीही न बोलणेच पसंत केले असल्याचे तिचे म्हणणे आहे. काही जणांनी चेक देऊन अभिनेत्रींचे तोंड बंद केले.

बडे अच्छे लगते है या मालिकेमुळे चाहता खन्ना चांगलीच नावारूपाला आली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. ती गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात, मालिकेत झळकलेली नाहीये. आता ती प्रस्थानम या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तिने इंडस्ट्रीमध्ये होत असलेल्या लैंगिक शोषणाविषयी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

चाहत खन्नाने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात अभिनेत्री कास्टिंग काऊचला बळी पडत असल्याचे म्हटले आहे. तिने या मुलाखतीत सांगितले आहे की, तू माझ्यासाठी ही गोष्ट केली तर मी तुझ्यासाठी ही गोष्ट करेन असेच काहीसे इंडस्ट्रीत पाहायला मिळते. निर्माते आणि अभिनेत्री यांच्यात काही वेळा संमतीने गोष्टी घडतात. इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच मोठ्या प्रमाणावर आहे. कास्टिंग डायरेक्टरसुद्धा अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असतात. पण याबाबत काहीही बोलले जात नाहीये. गेल्या वर्षी मीटू मुव्हमेंटमुळे अनेक स्त्रियांनी समोर येऊन लैंगिक शोषणाविषयी भाष्य केले होते. पण अनेक अभिनेत्रींनी याबाबत काहीही न बोलणेच पसंत केले असल्याचे तिचे म्हणणे आहे. काही जणांनी चेक देऊन अभिनेत्रींचे तोंड बंद केले. ज्यांचा पब्लिसिटी स्टंट होता, त्याच्या तो कामी आला. एखाद्या फॅशन ट्रेंड सारखा हा ट्रेंड आला होता असेच म्हणावे लागेल. 

चाहतने आतापर्यंत बडे अच्छे लगते है, कबूल है, कुमकुम: प्यारा सा बंधन, तुझ संग प्रीत लगाई सजना, भक्ती की शक्ती है यांसारख्या मालिकेत झळकली आहे. 2013ला चाहत खन्नाने फरहान मिर्झासोबत लग्न केले. फरहान हा प्रसिद्ध लेखक शाहरुख मिर्झा यांचा मुलगा आहे. त्या दोघांना दोन मुले आहेत. पण तिने काही दिवसांपूर्वी तिने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. याआधी चाहतचे भरत नरसिंघानी या बिझनेसमनसोबत लग्न झाले होते. चाहत केवळ 16 वर्षांची असल्यापासून त्यांचे अफेअर होते. पण हे लग्न देखील काहीच वर्षांत संपुष्टात आले होते. 

Web Title: 'I Know Many Actresses Who Chose To Not Speak' — Chahatt Khanna On The #MeToo Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.