ठळक मुद्देपंकज सांगतो, मला आजही आठवते, त्या काळात माझ्याकडे काम नव्हते. माझी पत्नी एका शाळेत शिकवायची. तिच्याच पगारावर आमचे घर चालायचे. माझ्या छोट्या-छोट्या वस्तू देखील ती तिच्या सॅलरीमधून विकत घेऊन मला देत असे. 

पंकज त्रिपाठीने आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसतो. एवढेच नव्हे तर अनेक वेबसिरिजमध्ये देखील त्याने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गँग्स ऑफ वासेपूर, न्यूटन यांसारख्या अनेक चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे. पंकजला आज बॉलिवूडमध्ये प्रचंड यश मिळाले असे तरी त्याचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता.

पंकजने बॉलिवूडमध्ये येण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. त्याने नुकतेच त्यांच्या संघर्ष दिवसांविषयी सांगितले आहे. पंकजने हिंदुस्थान टाईम्सच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आगामी चित्रपटांसोबतच त्याच्या संघर्ष काळातील दिवसांविषयी गप्पा मारल्या. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी त्याची पत्नी घर चालवायची. एवढेच नव्हे तर त्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू देखील तीच तिच्या सॅलरीमधून त्याला विकत घेऊन देत असे. पंकज एका छोट्याशा रूमममध्ये राहायचा. याविषयी पंकज सांगतो, मला आजही आठवते, त्या काळात माझ्याकडे काम नव्हते. माझी पत्नी एका शाळेत शिकवायची. तिच्याच पगारावर आमचे घर चालायचे. माझ्या छोट्या-छोट्या वस्तू देखील ती तिच्या सॅलरीमधून विकत घेऊन मला देत असे. 

पंकज त्रिपाठीने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर बॉलिवूडमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहून 2004 मध्ये तो मुंबईत आला. त्याला अभिषेक बच्चनच्या रन या चित्रपटात सगळ्यात पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात पंकजने चहा विकणाऱ्या एका व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्याची भूमिका केवळ काही मिनिटांची होती. त्यानंतर त्याने आक्रोश, गँग्स ऑफ वासेपूर, फुकरे, न्यूटन, स्त्री, लुका छुपी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकले.

बॉलिवूडमध्ये यश मिळवत असतानाच मिर्जापूर या वेबसिरिजद्वारे पंकजने डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले. या वेबसिरिजमधील कालीन भैय्या या त्याच्या व्यक्तिरेखेला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. 

Web Title: I had No Work, Wife Used to Run House, Says Pankaj Tripathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.