बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसाठी हे वर्षे खूप चांगलं गेलं. कारण यावर्षी त्यांनी कबीर सिंग सारखे दमदार चित्रपट दिले आहेत. कबीर सिंग चित्रपटानंतर पुन्हा एकदा शाहिद साऊथच्या आणखीन एका चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव जर्सी असणार आहे. या चित्रपटात शाहिद एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. 

जर्सी चित्रपटात अशा एका क्रिकेटरची कथा रेखाट्यात आली आहे जो वयाच्या ३०व्या वर्षी भारतीय क्रिकेट संघात निवड व्हावी म्हणून संघर्ष करत असतो.

या चित्रपटाबद्दल शाहिदने सांगितलं की, या कथेशी मी स्वतःला खूप रिलेट करतो आहे. कारण मी देखील विचार करत होतो की मला काहीतरी वेगळे केले पाहिजे कारण माझे चित्रपट चालत नव्हते. प्रत्येकाच्या जीवनात एक वेळ येतो जेव्हा तो विचार करतो की शेवटी माझ्यासोबत असं का होत नाही ? मी काही चुकीचं केलं आहे का?


शाहीद पुढे म्हणाला की, त्यानंतर त्याने यशाचा विचार न करता कामावर लक्ष केंद्रीत केले. मला ओरिजनल चित्रपट करायचा होता. कारण लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की मी फक्त रिमेक करतो आहे. मात्र जेव्हा मी जर्सी सिनेमा पाहिला तर मला खूप भावला. सिनेमा पाहताना मी ४ वेळा रडलो. हे पात्र कबीर सिंगसारखे नाही. तो खूप शांत आणि कमी बोलणारा आहे. 


शाहिद कपूर सध्या या चित्रपटासाठी ट्रेनिंग घेतो आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला चंदीगडमध्ये सुरूवात होणार आहे.

Web Title: i cried 4 times watching jersey says shahid kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.