'मी चांगला वडील नाही', शाहरुख खानने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 01:21 PM2021-10-15T13:21:57+5:302021-10-15T13:23:18+5:30

शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून मोठा लेक आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे.

'I am not a good father', lamented Shah Rukh Khan | 'मी चांगला वडील नाही', शाहरुख खानने व्यक्त केली खंत

'मी चांगला वडील नाही', शाहरुख खानने व्यक्त केली खंत

Next

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख गेल्या काही दिवसांपासून मोठा लेक आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला आता आणखी पाच दिवस तुरूंगात राहावे लागणार आहेत. त्यानंतर याप्रकरणी काय निकाल लागतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान शाहरूख खान नेहमी त्याच्या तीन मुलांबद्दल बोलत असतो. परंतु एकदा शाहरुख खानने लहान मुलगा अबरामबद्दल सांगितले होते की त्याने एक दिवस अबरामला बोलावले पण तो शाहरुख खानकडे आला नाही. त्यानंतर शाहरुख खानच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

अभिनेता शाहरुख खानने एकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मी एक दिवस अबरामसोबत बसलो होतो. मी त्याला माझ्या जवळ बसायला सांगितले. पण तो तिथून निघून गेला, माझ्या जवळ येऊन बसला नाही. म्हणून मी असे विचार करू लागलो की मी एक चांगला वडील नाही. मी माझ्या मुलांवर प्रेम केले नाही?

पुढे शाहरुख म्हणाला, 'मी माझ्या कामाला जास्त वेळ देतो का? मी मुलांना वेळ देऊ शकत नाही. एक दिवस तो एका मुलीसोबत उभा राहील आणि मला सोडून जाईल.' 
दुसऱ्या मुलाखतीत शाहरुख खानने आपल्या मुलांबद्दल एक गोष्ट शेअर केली. डीएनएला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख म्हणाला होता की तो अजिबात प्रोटेक्टिव्ह वडील नाही. मी प्रोटेक्टिव्ह वडिलांसारखा दिसतो पण तसे नाही. त्यांच्या आयुष्याचे निर्णय मी घेऊ शकत नाही. शाहरुखचे मुले कायम चर्चेत असतात. 

Read in English

Web Title: 'I am not a good father', lamented Shah Rukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app