I am afraid of darkness – Rajkumar Rao confesses on The Kapil Sharma Show | या कारणामुळे राजकुमार राव बाथरूमला जाताना आईला घेऊन जायचा सोबत

या कारणामुळे राजकुमार राव बाथरूमला जाताना आईला घेऊन जायचा सोबत

ठळक मुद्देराजकुमारने नमूद केले, “हो, मला अंधाराची भीती वाटते. लहान असताना मी भव्य बंगलेवजा घरात संयुक्त कुटुंबात राहत होतो. तिथे बंगल्याच्या दुसर्‍या कोपर्‍यात स्वच्छतागृह होते. त्यामुळे तिथे जाताना मी आईला सोबत घेऊन जात असे.

‘मेड इन चायना’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अष्टपैलू अभिनेता बोमन इराणी, राजकुमार राव आणि मौनी रॉय उपस्थित असणार आहेत. कपिल शर्मासोबत पडद्यावर हे तिघे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गुपिते उलगडताना दिसणार आहेत. अभिनेता बोमन इराणी जो एक फोटोग्राफर देखील आहे तो त्याचे पोर्ट्रेट फोटोग्राफीचे कौशल्य अर्चना पूरण सिंहवर आजमावताना दिसेणार आहे.

गप्पा मारताना कपिलने शाहरुख खान बोमन इराणीला सेक्स बॉम्ब असे का संबोधतो याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोमनने नमूद केले, “त्याला काही खास कारण नाही. तो असेच मस्करीत बोलतो. त्याला काही अर्थ नाही.” तथापि, नंतर त्याने ती केवळ अफवा असल्याचे नमूद केले. अफवांचा खेळ सुरू ठेवत कपिलने राजकुमार रावला भूताची खूप भीती वाटते त्याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला. बालपणी बाथरूमला जाताना तो त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन जात असे. याला पुष्टी देत राजकुमारने नमूद केले, “हो, मला अंधाराची भीती वाटते. लहान असताना मी भव्य बंगलेवजा घरात संयुक्त कुटुंबात राहत होतो. तिथे बंगल्याच्या दुसर्‍या कोपर्‍यात स्वच्छतागृह होते. त्यामुळे तिथे जाताना मी आईला सोबत घेऊन जात असे आणि मी बाथरूमच्या आता असताना तिला माझ्याशी बोलत राहण्याचा आग्रह करत असे.” 

जेव्हा बोमनने तो खूप भावूक असल्याचे आणि त्याला सहज रडू येते हे मान्य केले तेव्हा आणखी एका अफवेचा उलगडा झाला. त्याच्या लग्नात पत्नीच्या विदाईच्या वेळेस देखील हा अभिनेता रडला होता या बातमीविषयी कपिलने चौकशी केली. त्यावर बोमन कबुली देतो, “हो, माझ्या विवाहाच्या आदल्या दिवशी मी रडलो होतो.”
 


नंतर गप्पा मारताना हे स्पष्ट झाले की बोमन बेकरी चालवत असताना त्याला त्याच्या आयुष्यातील प्रेम झेनोबिया इराणी भेटली. या प्रसंगाचे वर्णन करताना बोमनने सांगितले की, “हो, मी माझ्या दुकानात बटाट्याचे वेफर्स विकायचो आणि मी दुकानदार असल्याचा मला अभिमान आहे. झेनोबिया दररोज बटाट्याचे वेफर्स घेण्यासाठी दुकानात यायची. मी विचार करायचो बटाट्याचे वेफर्स रोज कोण खाते. पण बर्‍याच काळानंतर मला समजले की ती वेफर्स विकत घेऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या भिकार्‍याला देत असे. आमची प्रेम कहाणी सुरू व्हायला जवळपास 6 ते 8 महिने लागले. तोपर्यंत रोज वेफर्स खाल्यामुळे त्या भिकार्‍याचे वजन चांगलेच वाढले होते.” 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: I am afraid of darkness – Rajkumar Rao confesses on The Kapil Sharma Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.