'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'चा हाइब्रिड रिलीज फॉरमॅट यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 08:21 PM2021-05-15T20:21:20+5:302021-05-15T20:22:00+5:30

ईदला प्रदर्शित झालेला सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे.

The hybrid release format of 'Radhe: Your Most Wanted Brother' is a success | 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'चा हाइब्रिड रिलीज फॉरमॅट यशस्वी

'राधे: योर मोस्ट वांटेड भाई'चा हाइब्रिड रिलीज फॉरमॅट यशस्वी

Next

राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सलमान खान आणि त्याच्या सर्व चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भारतात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. परदेशात हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी ४.२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. 

कोरोनाच्या संकटामुळे थिएटरसाठी बनवलेले चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करावे लागत आहे. राधे हा चित्रपट हाइब्रिड पद्धतीने प्रदर्शित केला आणि कोणत्याही चित्रपट निर्मात्याने किंवा मंचाद्वारे न चोखाळण्यात आलेला मार्ग त्यांनी चोखाळला जो आतापर्यंतचा एक व्यवहार्य निर्णय ठरला आहे. या कौटुंबिक मनोरंजक चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर मिळत असलेल्या प्रतिसादावरून सलमान खानच्या लार्जर दॅन लाईफ स्टारडमला अधोरेखित केले आहे, जे हिंदी चित्रपटसृष्टीत रजनीकांत यांच्या तोडीचे आहे. दिशा पटानीने देखील या चित्रपटात आपली चमक दाखवली असून ती भारताची 'द' ग्लॅम गर्ल बनण्याच्या तयारीत असल्याचे सिद्ध केले आहे.


'राधे'ला उदंड प्रतिसाद मिळत आहे, हे आणखी काही नसून, केवळ अभिनेत्याने केलेल्या उदार कार्याचे फलित आहे, जे त्याने समाज आणि गरजू लोकांसाठी आपले कर्तव्य मानून केले आहे. जो राधेला  ब्लॉकबस्टर बनवतो आहे. मतितार्थ हा आहे कि, सलमानने ईदसाठी जे वचन दिले होते, ते कोविडच्या कठीण पार्श्वभूमीवर देखील पूर्ण केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The hybrid release format of 'Radhe: Your Most Wanted Brother' is a success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app