‘हंगामा’ तर तुझ्या नवऱ्यानं केला...! ‘हंगामा 2’चं गाणं प्रदर्शित होताच शिल्पा शेट्टी झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 05:31 PM2021-07-21T17:31:21+5:302021-07-21T17:34:01+5:30

आज ‘हंगामा 2’ या चित्रपटाचा टायटल ट्रॅक ‘हंगामा हो गया’ रिलीज झाला. हे गाणं प्रदर्शित झालं आणि शिल्पाला लोकांनी पुन्हा ट्रोल करणं सुरू केलं.

hungama 2 title song hungama ho gaya out shilpa shetty troll because of husband raj kundra | ‘हंगामा’ तर तुझ्या नवऱ्यानं केला...! ‘हंगामा 2’चं गाणं प्रदर्शित होताच शिल्पा शेट्टी झाली ट्रोल

‘हंगामा’ तर तुझ्या नवऱ्यानं केला...! ‘हंगामा 2’चं गाणं प्रदर्शित होताच शिल्पा शेट्टी झाली ट्रोल

Next
ठळक मुद्दे2003 साली रिलीज झालेल्या ‘हंगामा’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सुपरडुपर हिट कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. आता तब्बल 18 वर्षांतर या सिनेमाचा सीक्वल येतोय.  

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) काही दिवसांपूर्वी ‘हंगामा 2’ (Hungama 2 ) या चित्रपटामुळे चर्चेत होती. 14 वर्षानंतर शिल्पा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. पण तिच्या या कमबॅकची आणखी जबरदस्त चर्चा व्हावी, याआधीच तिचा पती राज कुंद्राला (Raj Kundra) पोर्नोग्राफी प्रकरणी अटक झाली आणि शिल्पावर ट्रोल व्हायची वेळ आली. आज ‘हंगामा 2’ या चित्रपटाचा टायटल ट्रॅक ‘हंगामा हो गया’ (Hungama Ho Gaya)  रिलीज झाला. हे गाणं प्रदर्शित झालं आणि शिल्पाला लोकांनी पुन्हा ट्रोल करणं सुरू केलं.
‘हंगामा हो गया’ या गाण्यात शिल्पा शेट्टीनं खरंच ‘हंगामा’ केलाय. तिचा अंदाज बघण्यासारखा आहे. शिल्पा या गाण्यात बोल्ड अवतारात दिसत आहे. तिच्यासोबत अभिनेत्री प्रणिता सुभाष, मिझान जाफरी आणि परेश रावलही आहेत. तूर्तास हे गाणं प्रचंड व्हायरल होतंय आणि सोबत शिल्पा ट्रोलही होतेय.

‘हंगामा तर शिल्पा शेट्टीच्या नव-याने केला,’ असं एका युजरने या गाण्याच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना लिहिले आहे. शिल्पाला विचारा हंगामा कुणी केला, अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे. पत्नी योग करती है और पती पॉर्न बनाता है, अशा शब्दांत काहींनी तिला ट्रोल केले.  


2003 साली रिलीज झालेल्या ‘हंगामा’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सुपरडुपर हिट कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. आता तब्बल 18 वर्षांतर या सिनेमाचा सीक्वल येतोय.  ‘हंगामा 2’मध्ये परेश रावल  पुन्हा एकदा राधेश्याम तिवारीच्या भूमिकेत आहेत आणि शिल्पा शेट्टीने  त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. मिझान जाफरी  , आशुतोष राणा, राजपाल यादव आणि प्रणिता सुभाष हेही जोडीला आहेत. हा चित्रपट येत्या 23 जुलैला हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होईल.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: hungama 2 title song hungama ho gaya out shilpa shetty troll because of husband raj kundra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app