ठळक मुद्देहुमाआधी मुदस्सर सुश्मिता सेनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आला होता. दोघांच्याही अफेअरची दीर्घकाळ चर्चा होती.

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीहुमा कुरेशी आता तिच्या चित्रपटामुळे नव्हे तर तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. सध्या ती दिग्दर्शक मुदस्सर अजीज याला डेट करतेय. आता तर या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. होय, हुमा मुदस्सरसोबत लग्न करणार, अशी चर्चा आहे. तूर्तास हुमा याबद्दल काहीही बोलायला तयार नाही. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत हुमाला लग्नाबद्दल विचारण्यात आले. पण हुमाने थेट बोलणे टाळले. ‘लोकांना वाटते ते तर्क काढू द्या. मी फक्त एवढेच सांगेल की, मला माझ्या जवळच्या लोकांसोबत राहणे आवडते. मग ते मित्र असो वा कुटुंबीय,’ एवढेच हुमार म्हणाली.


 हुमाने गत सप्टेंबर महिन्यात मुदस्सरच्या वाढदिवसाला एक स्पेशल मॅसेज शेअर केला होता. या मॅसेजमध्ये हुमाने मुदस्सरवरील प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. यानंतर दोघांच्याही लव्हलाईफच्या चर्चा सुरु झाल्यात. आत्ता पाहिले तर या कपलचे इन्स्टाग्राम अकाऊंट एकमेकांच्या फोटोंनी गच्च भरलेले आहे.

मुद्दसर अझीझ हा लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने आजवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. दुल्हा मिल गया, हॅपी भाग जायेगी, हॅपी फिर भाग जायेगी यांसारखे त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. सध्या तो पती पत्नी और वो या चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यग्र आहे. कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. तसेच त्याने हॅपी भाग जायेगी, हॅपी फिर भाग जायेगी, दुल्हा मिल जायेगा, शोवबिझ यांसारख्या चित्रपटांची कथा देखील लिहिली आहे. 

हुमाआधी मुदस्सर सुश्मिता सेनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आला होता. दोघांच्याही अफेअरची दीर्घकाळ चर्चा होती. अर्थात कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले होते.

Web Title: huma qureshi marriage affairs with mudassar aziz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.