ठळक मुद्देमुद्दसरचा नुकताच वाढदिवस झाला. हुमाने एका खास अंदाजात त्याला सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हुमा कुरेशी आता तिच्या चित्रपटामुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. हुमा कुरेशी एका दिग्दर्शकाला डेट करत असून गेली वर्षभर ते दोघे नात्यात आहेत. त्यांच्या जवळच्या लोकांना याबद्दल माहीत असून ते त्यांच्या या नात्यासाठी प्रचंड खूश आहेत.

हुमा कुरेशी आणि दिग्दर्शक मुद्दसर अझीझ गेल्या एक वर्षापासून नात्यात असल्याचे मुंबई मिररने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. मुद्दसरचा नुकताच वाढदिवस झाला. हुमाने एका खास अंदाजात त्याला सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने मुद्दसरचा फोटो पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, तू जे काही करतोस त्याचा मला प्रचंड अभिमान आहे. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत अशी मी देवाला प्रार्थना करते. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...

हुमाच्या या पोस्टवर मुद्दसरने देखील रिप्लाय दिला आहे. त्याने म्हटले आहे की, यावर रिप्लाय देणे खूपच कठीण आहे. लोकांमध्ये काही दोष असले तरी त्यांची प्रशंसा कशी करायची हे केवळ तुलाच माहिती आहे. मी तुझे आभार मानणार नाही. कारण तुझे आभार मानणे माझ्यासाठी शक्यच नाहीये. लव्ह यू लॉट्स...

हुमाच्या या पोस्टनंतर आणि मुद्दसरच्या या रिप्लायनंतर त्या दोघांच्या नात्याची आता सगळ्यांनाच कल्पना आली आहे. मुद्दसर अझीझ हा लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने आजवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. दुल्हा मिल गया, हॅपी भाग जायेगी, हॅपी फिर भाग जायेगी यांसारखे त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. सध्या तो पती पत्नी और वो या चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यग्र आहे. कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. तसेच त्याने हॅपी भाग जायेगी, हॅपी फिर भाग जायेगी, दुल्हा मिल जायेगा, शोवबिझ यांसारख्या चित्रपटांची कथा देखील लिहिली आहे. 

हुमा कुरेशीने गँग ऑफ वासेपूर, डी डे, बदलापूर, देढ इश्किया यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. लीला ही तिची वेबसिरिज सध्या चांगलीच गाजत आहे. 

Web Title: Huma Qureshi confirms dating Mudassar Aziz; he thinks himself as 'the lucky one'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.