ठळक मुद्देरूहैल एक काश्मिरी पत्रकार आहे आणि आधीच विवाहित आहे. उत्तर काश्मिरमध्ये राहणारा रुहैल दिल्लीच्या एका न्यूज ऑर्गनायझेशनसाठी काम करतो.

हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पिता राकेश रोशन व भाऊ हृतिक यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत, सुनैनाने घर सोडले होते. काही महिन्यांपासून एका हॉटेलमध्ये ती राहत होती. पण आता सुनैना घरी परतली आहे. होय, सुनैनाचे तिचा कथित बॉयफ्रेन्ड रूहैल अमीनसोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. या ब्रेकअपनंतर सुनैना पुन्हा कुटुंबीयांकडे परतली आहे.
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, सुनैना व रूहैल यांचे नाते संपुष्टात आले आहे. यामुळे सुनैनाने हॉटेलसोडून आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. सध्या सुनैना आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहेत. काही दिवसांपूर्वी राकेश रोशन यांचा 70 वाढदिवस साजरा झाला. या सेलिब्रेशनमध्ये सुनैना हजर होती.

सुनैनाचा बॉयफ्रेन्ड रूहैला हा मुस्लिम होता. त्याच्यासाठी सुनैनाने घरच्यांसोबतचे सगळे संबंध तोडत आपल्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते.

‘माझे एका मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे आणि यामुळे माझा छळ सुरु आहे. माझ्या वडिलांनी यामुळे माझ्यावर हात उचलला. माझा बॉयफ्रेन्ड रूहैल दहशतवादी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. माझ्या कुटुंबाने रूहैलचा स्वीकार करावा, अशी माझी इच्छा आहे. त्याच्यासोबत लग्नाबद्दल सध्या मी काहीही सांगू शकत नाही. पण मला त्याच्यासोबत राहायचे आहे. तो मुस्लिम आहे, केवळ यामुळे माझे कुटुंब त्याचा स्वीकार करायला तयार नाही. ते म्हणतात, त्याप्रमाणे तो दहशतवादी असता तर त्याचे फोटो गुगलवर सगळीकडे कसे असते? , असे सुनैनाने एका मुलाखतीत म्हटले होते. सुनैनाच्या या खुलाशानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता.     

रूहैलनेही सुनैनाच्या बचाव करत रोशन कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. ‘ माझ्या धर्मामुळे मला अतिरेकी म्हणून कदापि योग्य नाही. विशिष्ट धर्माचा असल्यामुळे मला अतिरेकी ठरवले जात असेल तर ते दुर्दैवी आहे. मी याची तीव्र शब्दांत निंदा करतो. माझ्या व सुनैनाच्या नात्याला राकेश रोशन व पिंकी रोशन यांचा विरोध आहे. आमच्या मैत्रीवर त्यांचा आक्षेप आहे. सुनैनाच्या अवतीभवती सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती मला मिळतेय. हे सगळे आमच्या मैत्रीमुळे झाले. आधी सुनैनाने मला सांगितले तेव्हा मला विश्वास बसला नाही. मी तिच्या गोष्टीवर केवळ हसलो होतो. पण हे खरे आहे. सुनैना तिचे आयुष्य पुन्हा नव्याने सुरु करू इच्छिते. तिच्या कुटुंबाने तिला पाठींबा द्यावा, एवढीच तिची इच्छा आहे,’ असे रूहैल म्हणाला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: hrithik roshans sister sunaina roshan break up with her boyfriend ruhail amin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.