कडक, हृतिक रोशनचे बायसेप्स पाहून एक्स वाईफ सुजैन खानही झाली फिदा, केली अशी कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:00 PM2021-09-06T19:00:17+5:302021-09-06T19:07:09+5:30

हृतिकची पिळदार बॉडी आणि त्यात बायसेप्स पाहून त्याच्या या फोटोला चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Hrithik Roshans recent bicep pic even made Ex wife Sussanne Khan wow, she comments this | कडक, हृतिक रोशनचे बायसेप्स पाहून एक्स वाईफ सुजैन खानही झाली फिदा, केली अशी कमेंट

कडक, हृतिक रोशनचे बायसेप्स पाहून एक्स वाईफ सुजैन खानही झाली फिदा, केली अशी कमेंट

Next

कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात.हृतिक किती फिटनेस फ्रिक अभिनेता आहे हे काही वेगळे सांगायला नको. हृतिक सध्या आगामी  ‘फायटर’ सिनेमात व्यस्त आहे. 

नेहमीप्रमाणे या सिनेमातल्या भूमिकेसाठी हृतिक प्रचंड मेहनत घेत आहे. हृतिकचा ब्लॅक एंड व्हाइट शेडमधला एक फोटो समोर आला आहे. खुद्द हृतिकनेच हा फोटो शेअर केला आहे. फोटोसह लक्षवेधी कॅप्शनही दिली आहे. फोटोमधील आकर्षक तसंच तितकीच पिळदार बॉडी आणि जबरदस्त बायसेप्स तितकाच स्टायलिश लूक सध्या साऱ्यांनाच भावतो आहे. 

हृतिकची पिळदार बॉडी आणि त्यात बायसेप्स पाहून त्याच्या या फोटोला चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. चाहतेच नाही तर बॉलिवूड सेलिब्रेटीही त्याच्या या लूकवर फुल ऑन फिदा होत असल्याचे पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्यांमध्ये एका कमेंटने लक्ष वेधून घेतले आहे.

 

हृतिकची एक्स वाईफ सुजैनने त्याच्या या फोटोंवर कमेंट केली आहे. त्याच्या या लूकवर ती फुल ऑन फिदा असल्याचे या फोटोमधून पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच तिने अशा प्रकारे कमेंट केली असे नाही. याआधी तिने हृतिकचे लूक पाहून त्याच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळाले होते.हृतिक आणि सुजैन दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात. दोघेही एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतात. 

 


हृतिकचा हा फोटो पाहून अगदी तसेच बायसेप्स आणि पिळदार बॉडी बनवण्यासाठी प्रेरणा देईल. फिटनेसबाबत सजग असलेला हृतिक जिममध्ये घाम गाळत असल्याचे या फोटोत पाहायला मिळत आहे. त्याची  पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. हृितिक आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. रोज 20-30 मिनिटांची कार्डियो एक्सरसाइज करतो. तो आठवड्यातून 4 दिवस एक्सरसाइज करतो आणि तीन दिवस  आराम करतो. हृतिक फिटनेसचा इंटरनॅशनल ट्रेंड आणि वर्कआउट रुटीन फॉलो करतो.यामध्ये तो कार्डियो, स्ट्रेचिंग, पावर वर्कआउट करतो.
 

Web Title: Hrithik Roshans recent bicep pic even made Ex wife Sussanne Khan wow, she comments this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app