ठळक मुद्देहृतिक दुसरे कोणासोबत नव्हे तर त्याची पहिली पत्नी सुझान खानसोबत पुन्हा एकदा लग्न करणार असल्याच्या चर्चांना कित्येक दिवसांपासून ऊत आले आहे. पण या सगळ्या केवळ अफवा असल्याचे म्हटले जात आहे.

हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर हृतिक दुसरे लग्न करणार का याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना गेल्या काही महिन्यांपासून लागली आहे. हृतिक आता एका प्रसिद्ध महिलेसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून मीडियात येत आहेत. या महिलेसोबत अनेकवेळा हृतिकला पाहाण्यात देखील येते. 

हृतिक दुसरे कोणासोबत नव्हे तर त्याची पहिली पत्नी सुझान खानसोबत पुन्हा एकदा लग्न करणार असल्याच्या चर्चांना कित्येक दिवसांपासून ऊत आले आहे. पण या सगळ्या केवळ अफवा असल्याचे डेक्कन क्रोनिकल वर्तमानपत्राने त्यांच्या बातमीत म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे की, हृतिक आणि सुझान यांनी पुन्हा लग्न करावे अशी त्यांच्या फॅन्सची इच्छा आहे. पण या सगळ्या केवळ अफवा आहेत. त्यांच्या मुलांना ज्यावेळी गरज असते, त्यावेळी ते दोघे नेहमीच एकत्र असतात. त्यांच्या मुलांना त्यांच्या पालकांकडून प्रत्येक गोष्ट मिळावी यासाठी सुझान आणि हृतिक प्रयत्न करत असतात. 

हृतिक आणि सुझान यांचा घटस्फोट झाला असला तरी त्या दोघांना अनेकवेळा त्यांच्या मुलांसोबत एकत्र पाहायला मिळते. रेहान आणि रिदान या त्यांच्या मुलांसोबत ते नेहमीच क्वॉलिटी टाईम घालवत असतात. त्यांचा घटस्फोट झाला, त्यावेळीच त्यांनी सांगितले होते की, ते दोघे त्यांच्या मुलांचा एकत्रपणे सांभाळ करणार...

हृतिक आणि सुझानचा घटस्फोट झाल्यानंतरही ते दोघे एकमेकांच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये देखील एकमेकांच्या नेहमीच पाठिशी उभे असतात. हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन आजारी असताना तसेच हृतिकची बहीण सुनैना आणि त्यांच्या कुटुंबियात निर्माण झालेल्या वादाच्यावेळी देखील सुझान रोशन कुटुंबियांसोबत सतत पाहायला मिळाली. कंगना रणौतने हृतिक रोशनवर आरोप केल्यानंतरही सुझानने हृतिकची बाजू घेतली होती. 

हृतिक आणि सुझान यांनी 14 वर्षांच्या नात्यानंतर 2000 मध्ये प्रेमविवाह केला होता. पण त्यांनी अचानक घटस्फोटोचा निर्णय घेत त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला होता. 2014 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. 
 

Web Title: Hrithik Roshan-Sussanne Khan to remarry? Here’s the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.