Hrithik roshan to replace aamir khan in vikram vedha remake/ | हृतिक रोशन दिसणार 'विक्रम वेधा'च्या रिमेकमध्ये, आमिर खानने सोडला सिनेमा

हृतिक रोशन दिसणार 'विक्रम वेधा'च्या रिमेकमध्ये, आमिर खानने सोडला सिनेमा

गेल्या कित्येक दिवसांपासून दक्षिणच्या सुपरहिट सिनेमा ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकची चर्चा आहे. यापूर्वी आमिर खान आणि सैफ अली खान या सिनेमात मुख्य भूमिकेसाठी चर्चा करण्यात आली. मात्र, आमिर खानने या सिनेमात काम करण्यास नकार दिल्याचे समजतेय. आता या सिनेमात ह्रतिक रोशनची आमिर खानच्या भूमिकेसाठी निवड झाली असल्याची माहिती मिळाते आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, हृतिक रोशनशी एक-दोन महिन्यांपासून या चित्रपटाविषयी चर्चा सुरु आणि आता त्याने सिनेमात काम करण्यास तयार झाला आहे.. 

'विक्रम वेधा'च्या रिमेकपूर्वी हृतिक रोशन डिजिटल डेब्यू असणाऱ्या नाईट मॅनेजरचे शूटिंग पूर्ण करणार आहे. हा सिनेमा हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. 
  2021 मध्ये  रिलीज होणाऱ्या या सिनेमात हृतिक दोन वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहे. रिमेकचे दिग्दर्षन पुष्कर-गायत्री करणार आहेत ज्यांनी मूळ 'विक्रम वेधा' दिग्दर्शित केले होता.

पूर्वी हृतिक रोशनने ‘सुपर 30’ आणि ‘वॉर’ हे सलग 2 सुपरहिट चित्रपट दिले आहेत. याशिवाय, तो कृष सिरीजच्या चौथ्या सिनेमात झळकणार आहे. याशिवाय तो सिद्धार्थ आनंदच्या ‘फाइटर्स’ आणि ‘वॉर 2’  चित्रपटांमध्येही काम करताना दिसणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hrithik roshan to replace aamir khan in vikram vedha remake/

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.