हृतिक रोशन के घर में सीलन? नेटकऱ्यांना पडला प्रश्न; वाचा अभिनेत्यानं काय दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 04:53 PM2021-09-15T16:53:08+5:302021-09-15T16:55:19+5:30

‘हृतिक रोशन के घर में सीलन?’ ही चाहतीची कमेंट हृतिकच्या नजरेतून सुटली नाही. त्यानं यावर लगेच उत्तर दिलं.

Hrithik Roshan ke ghar par silan? asks Instagram user, actor wins internet with honest response | हृतिक रोशन के घर में सीलन? नेटकऱ्यांना पडला प्रश्न; वाचा अभिनेत्यानं काय दिलं उत्तर

हृतिक रोशन के घर में सीलन? नेटकऱ्यांना पडला प्रश्न; वाचा अभिनेत्यानं काय दिलं उत्तर

Next
ठळक मुद्देहृतिकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, हृतिक आणि दीपिका पदुकोण ‘फायटर’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनने (  Hrithik Roshan) एक फोटो शेअर केला आणि या फोटोंवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला. होय, सोशल मीडियावर हा फोटो क्षणात व्हायरल झाला. यावरच्या कमेंट्स तर विचारू नका. इतक्या की, अखेर हृतिकला या कमेंट्सवर उत्तर द्यावं लागलं. 
आता या फोटोत असं काय खास आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर खास आहे ती भिंतीवरची ओल. होय, या फोटोत हृतिक सेल्फी घेताना दिसतोय. तर बाल्कनीत त्याची आई उभी दिसतेय. हृतिकने हा फोटो शेअर केला आणि नेटकऱ्यांनी त्यातली भिंत अचूक टिपली. होय, कोट्यवधी रूपयांची संपत्ती असलेल्या हृतिकच्या घरातील एका भिंतीला ओल पडलीये,   भिंतीचे पापुद्रे निघताहेत म्हणजे काय? नेटक-यांनी ही गोष्ट नेमकी हेरली. मग   काय? चर्चा तर होणार. सोशल मीडियावर मग याची जबरदस्त चर्चा रंगली.

अनेकांनी यावरून हृतिकला ट्रोल केलं. अगदी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा दिग्दर्शक मालव राजदा यानंही हृतिकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. एका चाहतीनं तर स्पष्टचं लिहिलं. ‘गौर से देखिए हृतिक रोशन के घर में सीलन?’ अशी कमेंट तिनं केली. एवढा पैसा कुठं जातो? असा सवाल अन्य एका चाहत्यानं केला.


  
 हृतिकनं दिलं उत्तर...

‘गौर से देखिए हृतिक रोशन के घर में सीलन?’ ही चाहतीची कमेंट हृतिकच्या नजरेतून सुटली नाही. त्यानं यावर लगेच उत्तर दिलं. सध्या भाड्याच्या घरात राहतो आहे. लवकरच मी माझं घर घेणार आहे, असं त्यानं स्पष्ट केलं.
 हृतिकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, हृतिक आणि दीपिका  ‘फायटर’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.  सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्येही हृतिक दिसणार असल्याची चर्चा आहे. अर्थात अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hrithik Roshan ke ghar par silan? asks Instagram user, actor wins internet with honest response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app