hrithik roshan cousin sister pashmina roshan is all set for her bollywood debut | SEE PICS:  हृतिक रोशनची बहीण करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू; आहे कमालीची सुंदर
SEE PICS:  हृतिक रोशनची बहीण करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू; आहे कमालीची सुंदर

ठळक मुद्देपश्मिनाचा डेब्यू झालाच तर ती बी-टाऊनमध्ये पदार्पण करणारी ती रोशन कुटुंबाच्या तिस-या पिढीची सदस्य असेल.

हृतिक रोशनने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून डेब्यू केला आणि बॉलिवूडचा सुपरस्टार बनला. हृतिकच्या या डेब्यू सिनेमाने प्रेक्षकांना असे काही वेड लावले की, सगळ्या वयोगटातील लोक त्याचे चाहते बनले. आता हृतिकच्या पाठोपाठ रोशन कुटुंबातील आणखी एक व्यक्ती बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहे. होय, चर्चा खरी मानाल तर हृतिकचे काका राजेश रोशन यांची मुलगी पश्मिना रोशन लवकरच बॉलिवूड डेब्यू करू शकते. सध्या पश्मिना बॉलिवूड डेब्यूची तयारी करतेय.


सूत्रांच्या हवाल्याने स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, हृतिक स्वत: आपल्या लहान बहिणीला गाईड करतोय. हृतिक व पश्मिना एकमेकांच्या क्लोज आहे. यामुळे आपल्या बहिणीला तो स्वत:ला ट्रेनिंग देतोय. पश्मिना होम प्रॉडक्शनच्या चित्रपटातून डेब्यू करणार, अशी आधी चर्चा होती. पण आता एखाद्या मोठ्या बॅनरखाली तिचा डेब्यू होईल, अशी माहिती मिळतेय. 

सौंदर्याच्या बाबतीत पश्मिना इतर अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. सारा, जान्हवी, अनन्या यांनाही ती मात देऊ शकते. तिने बेरी जॉन अ‍ॅक्टिंग स्कूलमधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.

पश्मिनाचा डेब्यू झालाच तर ती बी-टाऊनमध्ये पदार्पण करणारी ती रोशन कुटुंबाच्या तिस-या पिढीची सदस्य असेल. पश्मिनाने थिएटर डेब्यू केला, तेव्हा हृतिकने तिची भरभरून प्रशंसा केली होती. येत्या 10 नोव्हेंबरला पश्मिना 24 वर्षांची होणार आहे.
पश्मिनाचे वडिल राजेश रोशन हे हृतिकचे बाबा राकेश रोशन यांचे धाकटे भाऊ आहेत. संगीतक्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. राजेश रोशन, राकेश रोशन व हृतिक रोशन या तिघांनी कहो ना प्यार है, क्रिश, क्रिश 3, काबिल अशा सिनेमात एकत्र काम केले आहे.
 

Web Title: hrithik roshan cousin sister pashmina roshan is all set for her bollywood debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.