ठळक मुद्देहृतिकने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, ऐश्वर्यासोबत सुरुवातीला काम करताना ती केवळ शोभेची बाहुली आहे, तिला अभिनय येत नाही असे मला वाटले होते. पण हा माझा सगळ्यात मोठा गैरसमज होता.

हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. त्यांनी धूम २, जोधा अकबर, गुजारिश अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जोधा अकबर आणि धुम २ या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडते. पण ऐश्वर्या ही चांगली अभिनेत्री नसून केवळ शोभेची बाहुली आहे असा समज हृतिकचा एकेकाळी झाला होता. त्यानेच एका मुलाखतीत या गोष्टीची कबुली दिली होती.

हृतिकने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, ऐश्वर्यासोबत सुरुवातीला काम करताना ती केवळ शोभेची बाहुली आहे, तिला अभिनय येत नाही असे मला वाटले होते. पण हा माझा सगळ्यात मोठा गैरसमज होता. मी तिला पारखण्यात चुकलो होतो. ती खूप टॅलेंटेड असून ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. मी धूम २ या चित्रपटात सगळ्यात पहिल्यांदा तिच्यासोबत काम केले. प्रत्येक गोष्टीवर ती घेत असलेली मेहनत, कामाबाबतीत असलेले तिचे प्रेम हे सगळे पाहून मी थक्क झालो होतो. 

हृतिक आणि ऐश्वर्या यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून ते दोघे पुन्हा एकत्र चित्रपटात कधी झळकणार याची वाट त्यांचे चाहते पाहात आहेत. हृतिक रोशनचा वॉर हा चित्रपट काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. तो लवकरच फराह खानच्या सत्ते पे सत्ता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे तर ऐश्वर्या राय बच्चन मणी रत्नमच्या आगामी चित्रपटात दिसणार असून या चित्रपटात ती एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.    

Web Title: Hrithik Roshan confesses that he misjudged Aishwarya Rai Bachchan PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.