Hrithik Roshan buys 2 new flat pays huge price sea facing view Mumbai | बाबो! हृतिक रोशननं खरेदी केलं स्वप्नातील घर, सी-फेसिंग व्ह्यू घराचा एरिया अन् किंमत वाचून व्हाल अवाक्

बाबो! हृतिक रोशननं खरेदी केलं स्वप्नातील घर, सी-फेसिंग व्ह्यू घराचा एरिया अन् किंमत वाचून व्हाल अवाक्

अभिनेता हृतिक रोशनने मुंबईत जुहू-वर्सोवा लिंक रोडवर दोन आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहेत. बऱ्या दिवसांपासून हृतिक रोशन त्याच्या स्वप्नातील घराची वाट बघत होता. अखेर त्याने हे घर आपल्या नावावर केलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशनला नेहमीच एक सी-फेसिंग व्ह्यू असणारं घर हवं होतं. त्यामुळे त्याने अनेक वर्ष दुसरं घर खरेदी केलं नव्हतं. पण आता त्याचा स्वप्नातील घराचा शोध संपला आहे. 

जुहू-वर्सोवा लिंक रोडवर हृतिकने घेतलेल्या या दोन अपार्टमेंटचा एरिया 38,000 स्क्वेअर फूट इतका आहे. हृतिकचे दोन अपार्टमेंट इमारतीच्या १४व्या, १५व्या आणि १६व्या फ्लोरवर आहेत. सोबतच त्याला 6500 स्क्वेअर फूटाचा मोकळा टेरेसही मिळाला आहे. या इमारतीचं नाव मन्नत आहे. 

त्यासोबतच असेही सांगितले जात आहे की, अपार्टमेंटमध्य स्पेशल लिफ्टसोबतच १० पार्किंग लॉटही त्याला मिळणार आहेत. इथे घर घेण्याआधी हृतिकने सुविधा आणि सुरक्षा दोन्हींची काळजी घेतली आहे. हे दोन्ही अपार्टमेंट हृतिकने समीर भोजवानी नावाच्या बिल्डरकडून घेतल्याचे समजते. ही संपूर्ण डील 97.50 कोटी रूपयांची झाल्याचे समजते. 

डीलच्या डिटेल्सबाबत सांगायचं तर हृतिकने डुप्लेक्ससाठी 67.50 कोटी रूपये दिले आहेत. तर दुसरं अपार्टमेंट 11,165.82 स्क्वेअर फूटाचं आहे. त्यासाठी त्याने ३० कोटी रूपये दिले आहेत. तसेच 1.95 कोटी रूपयांची त्याने स्टॅम्प ड्युटी भरली आहे. 

हृतिक लवकरच आपल्या परिवारासोबत या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होऊ शकतो. आतापर्यंत हृतिक आणि अक्षय कुमार शेजारी होते. पण आता हृतिक सी-फेसिंग घरात शिफ्ट होणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hrithik Roshan buys 2 new flat pays huge price sea facing view Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.