Hrithik Roshan, Alia Bhatt invited to join the Academy of Motion Picture Arts and Sciences | हृतिक रोशन व आलिया भटच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, फिल्म अ‍ॅकाडमीने उचलले हे पाऊल

हृतिक रोशन व आलिया भटच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, फिल्म अ‍ॅकाडमीने उचलले हे पाऊल

हृतिक रोशन आणि आलिया भट, कास्टिंग डिरेक्टर नंदिनी श्रीकेंत आणि टेज जोसेफ, कॉश्च्युम डिझाइनर नीता लुल्ला, डॉक्युमेंट्री फिल्ममेकर निष्ठा जैन आणि अमित मधेशिया, व्हिज्युअल इफेक्ट्स सुपरवायजर विशाल आनंद व संदीप कमाल आणि फिल्म स्कोअर कंपोझर नैनिता देसाई यांच्यासोबत 819 लोकांना अ‍ॅकाडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट अँड सायन्ससाठी बोलवण्यात आले आहे.

फिल्म अ‍ॅकाडमी संस्थेने नवीन निमंत्रित लोकांची यादी जाहीर केली. या लोकांनी निमंत्रण स्वीकारले तर त्यांना 25 एप्रिल, 2021ला पार पडणाऱ्या 93व्या अ‍ॅकाडमी अवॉर्ड्समध्ये त्यांचे मत मांडता येणार आहे.              


2020मध्ये फिल्म अ‍ॅकाडमीने 45 टक्के महिला, वंशीय समुदाय, 68 देशातील 49 टक्के आंतरराष्ट्रीय लोकांना अ‍ॅकाडमीच्या 2020मधील मेंबरशीपसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.


अ‍ॅकाडमीचे अध्यक्ष डेविड रुबिन यांनी सांगितले की, अ‍ॅकाडमी विविध प्रतिष्ठित सहकारी प्रवासांचे स्वागत करतो. आम्ही नेहमीच असामान्य प्रतिभा स्वीकारली आहे जी आपल्या जागतिक चित्रपट समुदायाच्या विविध प्रकारांना प्रतिबिंबित करते आणि यापूर्वी कधीही नाही.
अ‍ॅकाडमी पुरस्कार सोहळा 25 एप्रिल, 2021 ला पार पडणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hrithik Roshan, Alia Bhatt invited to join the Academy of Motion Picture Arts and Sciences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.