कबीर सिंगला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर शाहिद कपूरने अद्याप कोणत्या नव्या प्रोजेक्टबाबतचा खुलासा केला नाही. मात्र यादरम्यान आलेल्या वृत्तानुसार शाहिदने तेलगू अभिनेता नानीचा सुपरहिट चित्रपट जर्सीच्या हिंदी रिमेकसाठी होकार दिला आहे. या चित्रपटाची अमन गिल, अल्लू अर्जुन व निर्माते दिल राजू निर्मिती करत आहेत. सध्या अशी चर्चा आहे की या चित्रपटासाठी शाहिदला मोठी रक्कम मिळाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कबीर सिंग चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर शाहिद कपूरने आपल्या मानधनात वाढ केली आहे. जर्सीच्या हिंदी रिमेकसाठी जास्त मानधनाशिवाय त्याने या चित्रपटाच्या प्रॉफीटमधील शेअरही मागितला आहे. असं सांगितलं जातंय की, मानधन म्हणून त्याने ३५ कोटी रुपये घेतले आहेत आणि यासोबत तो प्रॉफीटमध्ये २० टक्के शेअर घेणार आहे.


शाहिद या चित्रपटाच्या शूटिंगला नोव्हेंबरमध्ये सुरूवात करणार आहे. या चित्रपटात शाहिद रश्मिका मंदानासोबत काम करणार आहे. कबीर सिंग चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर शाहिदला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. मात्र त्याने जर्सीच्या हिंदी रिमेकची निवड केली आहे.


जर्सी चित्रपटाचं दिग्दर्शन गौतम तिन्नानुरीनं केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या चित्रपटात नानीने क्रिकेटरची भूमिका केली होती.

या चित्रपटात भावनिक अंदाजही पहायला मिळणार आहे. हा चित्रपट यावर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित झाला होता.


Web Title: how much shahid kapoor is actually charging for the jersey remake
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.