ठळक मुद्देआयुषमान पूर्वी एका चित्रपटासाठी दोन करोड रुपये घेत असे. पण आता 2020 पासून त्याने चित्रपटांसाठी 10 करोड रुपये घ्यायला सुरुवात केली आहे. 

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना सध्या यशाच्या शिखरावर आहे. काहीच आठवड्यांपूर्वी त्याचा ड्रीम गर्ल चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने करमवीर सिंगची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती. मागील दोन वर्षांपासून आयुषमान सातत्याने हिट चित्रपट देत आहे. त्याची गणना आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये होते. 

आयुषमानने विकी डोनर, बरेली की बर्फी, शुभ मंगल सावधान, अंधाधुन, बधाई हो यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिल्यानंतर आता आयुषमानने त्याचे मानधन किती तरी पटीने वाढवले आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, आयुषमान पूर्वी एका चित्रपटासाठी दोन करोड रुपये घेत असे. पण आता 2020 पासून त्याने चित्रपटांसाठी 10 करोड रुपये घ्यायला सुरुवात केली आहे. 

आयुषमानला त्याचा विकी डोनर हा पहिला चित्रपट कशाप्रकारे मिळाला हे त्याने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. आयुषमाने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, विकी डोनर या चित्रपटाचे दिग्दर्शक शुजीत सरकार या चित्रपटासाठी एका पंजाबी मुलाच्या शोधात होते. त्यांनी मला एमटिव्हीवरील एका कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना पाहिले होते. त्यांनी कास्टिंग डायरेक्टर जोगी यांना माझ्याशी संपर्क साधायला सांगितला. मी त्यांना भेटायला गेलो असता मला पाहाताच मीच या चित्रपटातील भूमिकेसाठी योग्य असल्याची त्यांना जाणीव झाली आणि अशाप्रकारे या चित्रपटाच्या टीममध्ये माझी एंट्री झाली.

विकी डोनर या चित्रपटातील पहिल्या शॉर्टच्या अनुभवाविषयी आयुषमानने या मुलाखतीत सांगितले होते की, मला आजही माझा पहिला शॉर्ट चांगल्याप्रकारे आठवतो. मी बँकेत खाते उघडायला जातो आणि तिथे माझी यामीशी भेट होते, असा तो पहिला शॉर्ट होता. दिल्लीतील एका गेस्ट हाऊसमध्ये आम्ही या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राहात होता. याच गेस्ट हाऊसच्या गॅरेजमध्ये बँकेचा सेट उभारण्यात आला होता. माझा पहिला शॉर्ट असल्याने मी खूप नव्हर्स होतो. मी संवाद म्हणताना खूपच जोरात बोलत होतो. बहुधा मला सूत्रसंचालनची सवय असल्याने तसे होत होते. त्यामुळे शुजीत दा मला जरा हळू आवाजात बोल, असे सांगत होते. मला ते काही केल्या जमत नव्हते. पण तरीही अतिशय शांतपणे ते मला समजावत होते. केवळ या एका शॉर्टसाठी मी पाच ते सात रिटेक घेतले होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This is how much Ayushmann Khurrana may charge for his films after six consecutive successes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.