ठळक मुद्देसूर्याचे वडील प्रसिद्ध अभिनेते असले तरी त्याने चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी कापड गिरणीत काम केले होते. त्याने जवळजवळ तिथे आठ महिने काम केले. पण या दरम्यान तो इतक्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा असल्याचे त्याने त्या कंपनीत देखील कोणालाही सांगितले नव्हते.

दाक्षिणात्य अभिनेता सूर्याने आज दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने आज तामीळ चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्याला त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. सूर्याचे वडील फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेते असले तरी त्याने त्याच्या करियरसाठी त्यांच्या नावाचा कधीच वापर केला नाही.

सूर्या हा प्रसिद्ध अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा असून त्याचा भाऊ कार्थी हा देखील अभिनेता आहे. सूर्याचे वडील प्रसिद्ध अभिनेते असले तरी त्याने चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी कापड गिरणीत काम केले होते. त्याने जवळजवळ तिथे आठ महिने काम केले. पण या दरम्यान तो इतक्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा असल्याचे त्याने त्या कंपनीत देखील कोणालाही सांगितले नव्हते. तो इतर सामान्य लोकांसारखाच तिथे काम करत होता. पण काही महिन्यांनी त्याच्या बॉसला त्याचे वडील शिवकुमार असल्याचे कळले. त्याच्या बॉसला तेव्हा चांगलाच धक्का बसला होता.

सूर्या नोकरी करत असताना त्याला पगार देखील अतिशय कमी होता. सूर्या शिवकुमार यांचा मुलगा असल्याने त्याला अभिनयाच्या ऑफर सुरुवातीपासूनच येत होत्या. पण त्याला अभिनयात रस नसल्याने त्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. पण काही वर्षांनंतर त्याने चित्रपटात काम करण्याचे ठरवले. त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटांनाच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने काहीच वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट दिले. 

सूर्याचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री ज्योतिकासोबत झाले असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या फॅन्सना त्यांची जोडी खूप आवडते.

अनेक वर्षांच्या अफेअरनंतर त्यांनी लग्न केले. त्यांना दोन मुले असून त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला अनेकवेळा त्यांचे फोटो पाहायला मिळतात. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: How a garment factory worker turned into the most bankable Tamil star Suriya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.