बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नवीन वर्षात म्हणजे २०२०ची सुरूवात मोठ्या प्रोजेक्ट्सने करणार आहे. राधे चित्रपटात ती सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटांव्यतिरिक्त दिशा इंस्टाग्रामवरील बोल्ड फोटोंमुळे ट्रेडिंगमध्ये असते. ती वेगवेगळे बोल्ड फोटो शेअर करत असते.


दिशा पटानीने नुकतेच फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटोशूट लिंजरीसाठी केलं होतं. या फोटोत दिशाचा बोल्ड लूक समोर आला. ज्यात ती खूप सुंदर व फिट दिसते आहे.


सोशल मीडियावर दिशा पटानीचे खूप चांगला फॅन फॉलोविंग आहे. इंस्टााग्रामवर दिशाचे २७ मिलियन फॉलोवर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोवर्स असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 


राधे चित्रपटाशिवाय दिशा आदित्य रॉय कपूरसोबत मलंग चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी करत आहे. हा चित्रपट फेब्रुवारी २०२०मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.


दिशा पटानी तिच्या बॉलिवूड सिनेमापेक्षा खाजगी कारणामुळेच जास्त चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये तसेही अफेअर या गोष्टी प्रत्येक अभिनेत्रीशी जोडलेले असतातच. तसेच काहीसे दिशाबद्दलही आहे.

दिशाचे टायगर श्रॉफसह नाव जोडले जाते. मात्र यावर दोघेही बोलणे पसंत करत नाही. अनेक मुलाखतीमध्ये टायगर यावर स्पष्टीकरण देत सांगतो की, ''आम्ही केवळ चांगले मित्र आहोत'', हे दोघांचेही ठरलेले वाक्य. एका ताज्या मुलाखतीत दिशाला नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला. ‘तुम्ही दोघंही तुमचं नातं स्वीकारत का नाही’, असा थेट प्रश्न दिशासमोर ठेवला गेला. या प्रश्नाने दिशा थोडी अवघडली. पण अशा प्रश्नांना चतुराईने टाळायचे अंगी असलेले कसब तिने यावेळीही दाखवले.

Web Title: Hotness Overloaded! Disha Patani's photo in bikini went viral, received millions of likes in 7 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.