Himesh Reshammiya's angry reaction on Ranu Mondal's celebrity attitude | रानू मंडलबाबत विचारताच हिमेश रेशमिया संतापला, दिली ही प्रतिक्रिया

रानू मंडलबाबत विचारताच हिमेश रेशमिया संतापला, दिली ही प्रतिक्रिया

ठळक मुद्देरानूबाबत हिमेश रेशमियाला एका पत्रकार परिषदेत विचारले असता हिमेश चांगलाच संतापला. तुम्ही मला का विचारता? मी तिचा मॅनेजर नाही असे सडेतोड उत्तर हिमेशने दिले.

एका व्हायरल व्हिडीओमुळे अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेली रानू मंडल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अगदी अलीकडे एका चाहतीशी आणि मीडियाशी फटकून वागल्याने रानू चर्चेत आली होती. यानंतर तिच्या मेकओव्हरचा व्हिडीओ चर्चेत आला होता. मेकअपमधील रानूचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आणि या मेकअपमुळे रानू ट्रोल झाली होती.  

रानूचा हा हेवी मेकअप केलेला फोटो एका ब्यूटी इव्हेंटमधील असल्याचे म्हटले जात होते. या फोटोमध्ये रानूने डिझायनर कपडे घातले होते. सोबत हेवी मेकअप, हेवी ज्वेलरी असा तिचा लूक होता. तिचा हा अवतार पाहून अनेकजण सोशल मीडियावर रानू मंडलची खिल्ली उडवली होती. विशेषत: ट्विटरवर तिच्या या लुकवर अनेक मीम्स शेअर केले गेले होते. 

रानूला बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी हिमेश रेशमियाने दिली. हिमेशमुळेच रानू स्टार बनली. पण रानूच्या डोक्यात आता प्रसिद्धीची हवा शिरली असल्याचे म्हटले जात आहे. तिला यावरून सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल देखील करण्यात आले आहे. 

याच ट्रोलिंगबाबत नुकतेच हिमेश रेशमियाला एका पत्रकार परिषदेत विचारले असता हिमेश चांगलाच संतापला. त्याचे उत्तर ऐकून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. तुम्ही मला का विचारता? मी तिचा मॅनेजर नाही असे सडेतोड उत्तर हिमेशने दिले. तसेच तिला हिमेशने लाँच केले असल्याबद्दल विचारले असता त्याने उत्तर दिले की, केवळ रानूलाच नव्हे तर पलक मुच्चाल, दर्शन, आर्यन यांना देखील मी लाँच केले आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Himesh Reshammiya's angry reaction on Ranu Mondal's celebrity attitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.