‘-म्हणून मी रणबीर व रिद्धिमासोबत राहात नाही’; नीतू कपूर यांनी सांगितलं एकटं राहण्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 05:29 PM2021-05-13T17:29:55+5:302021-05-13T17:31:31+5:30

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) एकट्या राहतात. रिद्धिमा कपूर तिच्या घरी परतली आहे आणि रणबीर कपूरचे म्हणाल तर तो त्याची ‘लेडी लव्ह’ आलिया भटसोबत राहतोय.

Here's why Neetu Kapoor doesn't stay with Ranbir Kapoor-Riddhima Kapoor | ‘-म्हणून मी रणबीर व रिद्धिमासोबत राहात नाही’; नीतू कपूर यांनी सांगितलं एकटं राहण्यामागचं कारण

‘-म्हणून मी रणबीर व रिद्धिमासोबत राहात नाही’; नीतू कपूर यांनी सांगितलं एकटं राहण्यामागचं कारण

Next
ठळक मुद्देमला माझे स्वातंत्र्य प्रिय आहे. माझे आयुष्य जसे आहे, तसे मला आवडते, असे त्यांनी सांगितले.

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) एकट्या राहतात. मुलगी रिद्धिमा कपूर ( Riddhima Kapoor) काही दिवस आईसोबत राहिली. ती आता दिल्लीला तिच्या घरी परतली आहे आणि रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) म्हणाल तर तो त्याची ‘लेडी लव्ह’ आलिया भटसोबत राहतोय. मध्यंतरी आईला एकटे सोडून आलियासोबत राहायला गेल्यामुळे रणबीर ट्रोलही झाला होता. पण आता यामागचे खरे कारण समोर आले आहे. एकटं राहण्याचा निर्णय नीतू कपूर यांचा स्वत:चा आहे. एका ताज्या मुलाखतीत त्यांनी स्वत: याबद्दल खुलासा केला.
‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी  एकटं राहण्यामागचे कारण सांगितले, (Here's why Neetu Kapoor doesn't stay with Ranbir Kapoor-Riddhima Kapoor Sahni)

मेरे दिल में रहो, सर पे मत चढो...
माझी दोन्ही मुलं म्हणजे रिद्धिमा व रणबीर या दोघांनीही आपआपल्या आयुष्यात बिझी राहावे, असे मला वाटते. मेर दिल में रहो, मेरे सर पे मत चढो, असे मी त्यांना नेहमी म्हणते, असे नीतू यांनी सांगितले.

मी रिद्धिमासोबत राहून वैतागले होते...
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर रिद्धिमा अनेक महिने मुंबईत आईसोबत राहिली. पण रिद्धिमाने तिच्या सासरी परत जावे, पतीसोबत राहावे, अशी नीतू यांची इच्छा होती. त्यांनी सांगितले, लॉकडाऊनकाळात रिद्धिमा माझ्यासोबत राहत होती, त्या वर्षभरात मी कमालीच्या स्ट्रेसमध्ये होते. मी अस्वस्थ व्हायचे. प्लीज, सासरी जा, भरत एकटा आहे, असा तगादा मी तिच्यामागे लावला होता, मला तिला इथून पळवून लावायचे होते. कारण मला एकटीला राहायचे होते. मला प्रायव्हर्सी आवडते. मला असेच जगायला आवडते,असेही नीतू यांनी सांगितले.

मुलांशिवाय राहायची सवय झाली होती..
मला मुलांपासून दूर राहायची सवय झाली होती. रिद्धिमा शिक्षणासाठी लंडनला गेली होती तेव्हा मी अनेक दिवस रडले होते. रिद्धिमाचा एखादा मित्र आला तरी मी रडायला लागायची. पण यानंतर रणबीर बाहेर गेला, तेव्हा मी अजिबात रडले नव्हते. आई माझ्यावर प्रेम करत नाही, असे रणबीर म्हणालाही होता. पण असे नव्हते. फक्त मला मुलांपासून दूर राहण्याची सवय झाली होती. माझी दोन्ही मुलं विदेशात होती. त्या काळात मी अधिक स्ट्रॉन्ग झाले होते. पुढे त्या एकटेपणाची मला सवय झाली. ते येतात तेव्हा मला आनंद होतो. पण त्यांनी सतत सोबत राहणे गरजेचे नाही. संपर्कात राहा, कनेक्ट राहा पण माझ्या अवतीभवती राहण्याची गरज नाही, असे मी त्यांना सांगते. मला माझे स्वातंत्र्य प्रिय आहे. माझे आयुष्य जसे आहे, तसे मला आवडते, असेही त्यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Here's why Neetu Kapoor doesn't stay with Ranbir Kapoor-Riddhima Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app