ठळक मुद्देनुकताच डिंपल यांची आई बेटी कपाडिया यांचा ८० वा वाढदिवस साजरा झाला होता.  

ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार हिंदुजा हॉस्पिटलबाहेर दिसले आणि डिंपल कपाडिया रूग्णालयात भरती असल्याची बातमी आली. 62 वर्षीय डिंपल यांची प्रकृती खराब असल्याची बातमी येताच, चाहते अस्वस्थ झाले. पण काहीच तासांत डिंपल रूग्णालयात भरती असल्याची बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
गुरुवारी अक्षय कुमार हिंदुजा रूग्णालयाबाहेर दिसला होता. पाठोपाठ ट्विंकल खन्ना ही सुद्धा हिंदुजा बाहेर दिसली होती. या दोघांना हिंदुजाबाहेर पाहून डिंपल आजारी असून या रूग्णालयात भरती असल्याचा कयास लावला गेला होता.

डिंपल रूग्णालयात भरती असल्याचे वृत्त लगेच कानोकानी झाले होते. पण आता एक वेगळीच बातमी समोर आलीय. होय, डिंपल नाही तर त्यांची आई बेटी कपाडिया हिंदुजात भरती आहेत.

होय, खुद्द डिंपल यांनी तसा खुलासा केला. मी जिवंत आहे आणि ठणठणीत आहे. मी नाही तर माझी आई बेटी कपाडिया रूग्णालयात भरती आहे. तिच्या प्रकृतीतही सुधारणा आहे. सर्वांच्या प्रार्थना आणि शुभेच्छांची अपेक्षा करते, असे डिंपल यांनी आयएएनएससोबत बोलताना स्पष्ट केले.

नुकताच डिंपल यांची आई बेटी कपाडिया यांचा ८० वा वाढदिवस साजरा झाला होता.  अक्षय आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुंबई बाहेर शिलिम्ब येथे बेटी यांचा वाढदिवस साजरा केला होता. ट्विंकलने या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. 
डिंपल कपाडिया लवकरच हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहेत. हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांच्या एका अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटात डिंपल महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ‘टेनेट’ असे या चित्रपटाचे नाव आहे. जुलै 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Here’s how Dimple Kapadia reacted to her hospitalisation rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.