Hearing the cost of this dress of janhvi kapoor will blow your senses the price is in millions | बापरे बाप! इतक्या लाखांचा ड्रेस घालून जान्हवी कपूरने केलं फोटोशूट, किंमत वाचून येईल तुम्हाला भोवळ

बापरे बाप! इतक्या लाखांचा ड्रेस घालून जान्हवी कपूरने केलं फोटोशूट, किंमत वाचून येईल तुम्हाला भोवळ

जान्हवी कपूरने धडक चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.  त्यानंतर ती कोणत्याना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते.  जान्हवी शेवटची नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या गुंजन सक्सेना - द कारगिल गर्लमध्ये दिसली होती.  या सिनेमात आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती,  सध्या जान्हवी तिच्या ‘रुही’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

रुही सिनेमात जाह्नवीच्या अंगात एक भूत शिरते आणि राजकुमार राव आणि वरुण शर्मा जाह्नवी कपूरचे अपहरण करतात, परंतु या अपहरणानंतर तिचे रूप बदलते. जाह्नवीच्या अंगातून भूत काढण्यासाठी राजकुमार राव आणि वरुण शर्मा अनेक उपायोजना करताना दिसत आहेत. या चित्रपटात कॉमेडीबरोबर हॉरर सीन दाखवण्यात आले आहेत.

अलीकडेच ती रुहीचा सिनेमाच्या प्रमोशनसाठी तिचा सहकलाकार राजकुमार राव याच्यासोबत  दिसली. रुहीच्या प्रमोशन दरम्यान जान्हवीने खूप महागडा ड्रेस घातला होता.  एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार  तिच्या या स्ट्रेपलेस सिल्क निऑन ड्रेसची किंमत तब्बल २.७४लाख रुपये आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले जान्हवी कपूरने नुकतेच 'गुड लक जेरी'चे पहिले शेड्युल पूर्ण केले आहे.  हा साऊथ स्टार नयनतारा अभिनित तमिळ चित्रपटाचा कोलामावू कोकिलाचा रिमेक आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hearing the cost of this dress of janhvi kapoor will blow your senses the price is in millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.