Hderabad fire breaks out on the sets of chiranjeevis sye raa | चिरंजीवी यांच्या फॉर्मफाऊसला आग, अमिताभ आजपासूनच सुरु करणार होते शूटिंग

चिरंजीवी यांच्या फॉर्मफाऊसला आग, अमिताभ आजपासूनच सुरु करणार होते शूटिंग

ठळक मुद्देया आगीत जवळपास 2 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

साऊथाचा सुपरस्टार चिरंजीवी यांच्या हैदराबादमधल्या फार्म हाऊसला शुक्रवारी आग लागली. या आगीत तिथं असलेला सिनेमाचा सेटदेखील जळून खाक झाला. या आगीत जवळपास 2 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या सेटवर चिरंजीवी आपला आगामी सिनेमा 'सई रा नरसिम्हा रेड्डी'चे शूटिंग करत होते. 
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सेटवर ज्यावेळी आग लागली तेव्हा कोणीही उपस्थित नव्हते. तसेच ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यापूर्वीही 'सई रा नरसिम्हा रेड्डी' च्या सेटला आग लागली होती.  सई रा नरसिम्हा रेड्डी' हा सिनेमा  स्वातंत्र्य सेनानी यू नरसिम्हा रेड्डी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम अशा चार भाषांत प्रदर्शित होणार आहे.  या चित्रटात अमिताभ साऊथ सुपरस्टार चिरंजीवी बरोबर दिसणार आहेत. यात अमिताभ कॅमिओ अर्थात अतिथी भूमिका साकारताना दिसतील. आज बिग बी या सिनेमाचे शूटिंग करणार होते मात्र आग लागल्यामुळे सिनेमाचे शूटिंग कॅन्सल करण्यात आले. 


अमिताभ बच्चन पहिल्यांदा साऊथच्या सिनेमात काम करत आहे. आपल्या लूकचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअरदेखील केले होते. या सिनेमाची निर्मिती चिरंजीवी यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता राम चरण करत आहे. तर सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कमान सुरेंदर रेड्डी यांच्या खांद्यावर आहे.  

Web Title: Hderabad fire breaks out on the sets of chiranjeevis sye raa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.