अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतीच विराट कोहलीसोबत वेस्टइंडिजवरून भारतात परतली आहे. वेस्ट इंडिजमधील विराट कोहलीअनुष्का शर्माने काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण भारतात परतल्यावर तिने तिच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर तिचे बिकनीतील फोटो शेअर केले आहेत. तिचे हे बिकनीतील फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा भलेही चित्रपटांपासून दूर असली तरी देखील ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. अनुष्का तिच्या चाहत्यांना प्रत्येक गोष्टींचे अपडेट देत असते. अनुष्का शर्माने बिकनीतील फोटो शेअर करत लिहिलं की, वॉटर बेबी. 


यापूर्वी अनुष्काने बिकनीतील फोटो शेअर केला होता.

या फोटोत तिने ऑरेंज रंगाचा स्विम सुट परिधान केला होता. यामध्ये ती खूप हॉट दिसते होती. या फोटोत अनुष्का समुद्राच्या किनारी बसली होती आणि तिने ड्रॉप इयररिंग व सनग्लासेस घातले होते. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिलं होतं की, सन किस्ड एंड ब्लेस्ड. मात्र या फोटोची तुलना व्हिएलसीसोबत झाली होती.

अनुष्का नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती मागील वर्षी डिसेंबरमध्ये शाहरूख खानच्या झिरो चित्रपटात झळकली होती.

या चित्रपटानंतर अनुष्का बॉलिवूडपासून दूर आहे.मात्र लवकरच ती वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


Web Title: Have you seen Virat Kohli's Water Baby ?, Anushka Sharma shared in a bikini photo on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.