हा फोटो बालदिनानिमित्त तुफान व्हायरल झाला आहे. फोटोत दोन चिमुकल्या दिसत आहेत. या दोन्हीच्या फोटोमधली एक चिमुकली आज बॉलिवूडची आघाडीची नायिका आहे. इतकेच नाही तर ती तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामध्ये सा-यांची वाहवा मिळवत असते. ती दुसरी तिसरी कोणीही नसून ती आहे बॉलिवूडची बिल्लो राणी बिपाशा बसु. बिपाशाने अनेक सिनेमांत बोल्ड भूमिका करत हॉट अॅक्ट्रेसच्या यादीत आपले स्थान मिळवले आहे. ती बोल्ड दृष्यांमुळे चर्चेत राहीली. बिपाशा बासू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहणं तिला आवडतं.

 

अभिनेता करणसिंह ग्रोवरसह ती लग्न करत आपल्या आयुष्याला नवीन सुरूवात केली आहे. बिपाशा-करणच्या 'कपलासन'ची सोशल मीडियात जोरदार चर्चा झाली होती.  बिपाशाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नजर टाकल्यास तिचे सर्वाधिक फोटो हे बिकीनीत असल्याचं पाहायला मिळेल.  बिपाशाने अभिनय क्षेत्रात करिअर केलचं, पण ती एक यशस्वी डिझायनर देखील आहे.

 

बिपाशा गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत ती चाहत्यांसह कनेक्ट राहते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. 

Web Title: Have you seen Bipasha Basu's childhood pics, Now she is bollywood's boldest actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.