'Hathi My Partner' remake announced! Rajesh Khanna's role to make 'this' artist !! | ​झाली ‘हाथी मेरे साथी’च्या रिमेकची घोषणा! ‘हा’ कलाकार साकारणार राजेश खन्नांची भूमिका!!

​झाली ‘हाथी मेरे साथी’च्या रिमेकची घोषणा! ‘हा’ कलाकार साकारणार राजेश खन्नांची भूमिका!!

‘हाथी मेरे साथी’ हा सुपरस्टार राजेश खन्नाचा सुपरडुपर हिट चित्रपट आठवतोयं? खरे तर हा चित्रपट विस्मरणात जाणे शक्यचं नाही. गेल्या काही महिन्यांपासून या क्लासिक चित्रपटाचा रिमेक येणार, अशी चर्चा होती. ही चर्चा आता खरी ठरलीय. होय, ‘हाथी मेरे साथी’च्या रिमेकची घोषणा झालीयं. ट्रिनिटी पिक्चरच्या बॅनरखाली हिंदी, तेलगू व तामिळमध्ये या चित्रपटाचा रिमेक रिलीज केला जाईल.आता ‘हाथी मेरे साथी’चा रिमेक बनणार म्हटल्यावर त्यात राजेश खन्नाच्या भूमिकेत कोण दिसणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचेही उत्तर आहे. होय, ‘बाहुबली’मध्ये भल्लालदेवची भूमिका साकारणारा राणा दग्गुबत्ती ‘हाथी मेरे साथी’च्या रिमेकमध्ये राजेश खन्नाची भूमिका  साकारणार आहे. राणाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘हाथी मेरे साथी’च्या रिमेकमध्ये काम करण्यास मी उत्सूक आहे. अर्थात हा रिमेक ओरिजनल चित्रपटापेक्षा पूर्णत: वेगळा असणार आहे. मानवाच्या आयुष्यात निसर्गाचे मोठे महत्त्व आहे आणि हाच धागा पडकून मानव आणि हत्ती यांच्यातील एका अनोख्या नात्याची कथा यात दिसेल, असे राणाने सांगितले.  तामिळ दिग्दर्शक प्रभू सोलोमन हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणे अपेक्षित आहे. या बिग बजेट चित्रपटात अ‍ॅक्शन दृश्यांची भरमार असल्याचे कळते. शिवाय देश-विदेशात चित्रपटात चित्रीकरण होईल.

ALSO READ : ‘बाहुबली’मधील भल्लालदेवने हे काय हाल केले? घरातील लोकांनाही ओळखणे झाले मुश्कील !

‘हाथी मेरे साथी’ हा ओरिजनल चित्रपट १९७१ मध्ये रिलीज झाला होता. तामिळ दिग्दर्शक एमए थिरूमुगम यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सलीम जावेद या जोडीने या चित्रपटाची कथा लिहिली होती. पुढे या जोडीने अनेक हिट कथा दिल्यात. राजेश खन्ना आणि अभिनेत्री तनुजा यात लीड रोलमध्ये दिसले होते. त्यावर्षांतला राजेश खन्ना यांचा हा सर्वाधिक सुपरहिट सिनेमा होता. विशेष म्हणजे, १९६९ ते १९७१ या वर्षांत राजेश खन्ना यांनी एकापाठोपाठ एक असे १७ हिट सिनेमे दिले होते. ‘हाथी मेरे साथी’ त्यापैकीच एक होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Hathi My Partner' remake announced! Rajesh Khanna's role to make 'this' artist !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.