Happy Republic Day 2020: देशभक्तीने भारलेली गाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 08:00 AM2020-01-26T08:00:00+5:302020-01-26T08:00:02+5:30

ही गाणी ऐकूण तुमचं मन भरुन येईल....

Happy Republic Day 2020 Patriotic songs of bollywood | Happy Republic Day 2020: देशभक्तीने भारलेली गाणी!

Happy Republic Day 2020: देशभक्तीने भारलेली गाणी!

googlenewsNext

देशभक्तीवर आधारित अशी काही गीते आहेत, जी ऐकल्यानंतर आपल्यात देशभक्ती जागृत झाल्याशिवाय राहत नाही. आज प्रजासत्ताक दिन. या दिवसाच्या निमित्ताने अशाच काही गीतांविषयी जाणून घेऊयात...  

ए वतन


 राजी या चित्रपटातील हे गाणे तुमच्यामध्ये नवा उत्साह भरणारे आहे.

चक दे इंडिया



चक दे इंडिया या चित्रपटातील चक दे इंडिया हे गाणे ऐकताच एक वेगळा प्रकारचा जोश निर्माण होतो.

ए मेरे प्यारे वतन 



काबुलीवाला या चित्रपटात मन्ना डे यांनी गायलेले ए मेरे प्यारे वतन हे गाणे ऐकताना नकळत डोळ्यात पाणी येते. आज या गाण्याला अनेक वर्ष झाली असली तरी आजही हे गाणे तितकेच ताजे वाटते.

ए मेरे वतन के लोगो



लता मंगेशकर यांनी युद्धानंतर गायलेले ए मेरे वतन के लोगो हे गाणे ऐकताना त्या वेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना देखील आपले अश्रू आवरता आले नव्हते लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक गाणे आहे.

आय लव्ह माय इंडिया

परदेस या चित्रपटातील कविता कृष्णमूर्तीने गायलेले आय लव्ह इंडिया हे गाणे आणि या गाण्याचे बोल मनाला नक्कीच स्पर्शून जातात.

ए वतन तेरे लिये



कर्मा या चित्रपटातील ए वतन तेरे लिये हे गाणे आपल्याला नक्कीच देशप्रेमाची आठवण करून देणारे आहे.

अब तुम्हारे हवाले वतन साथीयो



हकीगत या चित्रपटातील अब तुम्हारे हवाले वतन साथीयो हे गाणे देशभक्तीपर गीतांमधील अनेकजणांचे सगळ्यात आवडते गाणे आहे.

मेरा रंग दे बसंती चोला



शहीद या चित्रपटाला आज इतके वर्ष झाले असले तरी या चित्रपटातील सगळीच गाणी आजही रसिकांच्या ओठावर रुळलेली आहेत. 

रंग दे बसंती



रंग दे बसंती या चित्रपटाची कथा ही आजच्या जमान्यातील असली तरी कथेचा संबंध हा भगत सिंग यांच्या काळाशी लावण्यात आला होता. या चित्रपटातील रंग दे बसंती हे गाणे अफलातून आहे.

संदेसे आते है



बॉर्डर चित्रपटातील संदेसे आते हे गाणे बॉर्डर वर असणाऱ्या सैनिकांची अवस्था अगदी योग्य रीतीने मांडते.

भारत हम को जान से प्यारा है



रोजा या चित्रपटात ए आर रहमान यांनी गायलेले भारत हम को जान से प्यारा है हे गाणे प्रत्येक भारतीयाच्या मनाला भिडणारे आहे.

Web Title: Happy Republic Day 2020 Patriotic songs of bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.