माझ्या पोटावर लाथ मारू नकोस...! ‘कॅप्टन कुल’ धोनीला पाहून घाबरला बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:08 PM2021-08-03T14:08:41+5:302021-08-03T14:14:06+5:30

गुलशन ग्रोव्हर सध्या थोडे घाबरलेले आहेत. आता इतका मोठा स्टार माणूस का व कोणाला घाबरणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर आहे, महेंद्रसिंग धोनीला.

Gulshan Grover urges M S Dhoni not to take up any 'Don Roles' after Dhoni's new hairstyle, | माझ्या पोटावर लाथ मारू नकोस...! ‘कॅप्टन कुल’ धोनीला पाहून घाबरला बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’

माझ्या पोटावर लाथ मारू नकोस...! ‘कॅप्टन कुल’ धोनीला पाहून घाबरला बॉलिवूडचा ‘बॅडमॅन’

Next
ठळक मुद्देबॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायकांमध्ये अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांचा समावेश आहे.

बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’ गुलशन ग्रोव्हर  (Gulshan Grover) सध्या थोडे घाबरलेले आहेत. आता इतका मोठा स्टार माणूस का व कोणाला घाबरणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर आहे, महेंद्रसिंग धोनीला. होय, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेन्द्रसिंग धोनीची (MS Dhoni) नवी स्टाईल बघून गुलशन ग्रोव्हर यांना धडकी भरली आहे. सध्या त्यांचं ट्वीट चांगलंच चर्चेत आहे.
अलीकडे कॅप्टन कूल धोनीनं त्याचे नव्या लूकमधील  (MS Dhoni New Look) काही फोटो शेअर केले होते. माहीची हेअरस्टाईल आणि एकंदरच त्याच्या या नव्या लुकची जोरदार चर्चा झाली.अनेकांना माहीचा हा कुल अंदाज आवडला. गुलशन ग्रोव्हर यांनी धोनीच्या याचं नव्या लुकचे फोटो शेअर करत ट्वीट केलं आहे. धोनीचा हा नवा लुक आवडल्याचं त्यांनी यात लिहिलंय. पण सोबत एका गोष्टीची भीतीही व्यक्त केली आहे.

‘भावा, खूपचं मस्त लुक आहे. पण कृपा करून एखादी डॉनची भूमिका चालून आलीच तर ती स्वीकारून माझ्या पोटावर लाथ मारू नकोस. आधीच माझे तिन भाऊ संजय दत्त, सुनली शेट्टी आणि जॅकी श्रॉफ मला या धंद्यातून बाहेर काढू पाहत आहेत. आलिम हाकिम ‘बॅड मॅन’ तुझ्याकडे येतोय,’ असं या  मजेशीर ट्वीट त्यांनी केलं.
गुलशन यांचं हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.  ‘आदरणीय गुलशन ग्रोव्हर सर, तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही. प्रत्येक काळात वेगवेगळे डॉन येऊ शकतात पण बॅडमॅन केवळ एकच असू शकतो,’ असं एका युजरने त्यांच्या या ट्वीटवर कमेंट करताना लिहिलं आहे. अनेक चाहत्यांनी याच आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायकांमध्ये अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आणि ते आजही कायम आहे. त्यांनी जास्त निगेटिव्ह भूमिका केल्या आहेत. त्यामुळे त्यांना बॅडमॅन असं संबोधलं जातं.
 

Web Title: Gulshan Grover urges M S Dhoni not to take up any 'Don Roles' after Dhoni's new hairstyle,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app