ठळक मुद्देसुनीता आणि गोविंदा यांनी १९८७ मध्ये घरातील अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत मंदिरात लग्न केले होते. हे लग्न त्यांनी सगळ्यांपासून वर्षभर लपवले होते. गोविंदा त्याकाळात अभिनेता म्हणून नुकतेच आपले स्थान निर्माण करत होता.

गोविंदाने ४९ व्या वर्षी दुसरे लग्न केले होते हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल ना... पण गोविंदाने दुसरे लग्न दुसरे कोणासोबत नव्हे तर त्याच्या पत्नीसोबतच केले होते. या वयात पुन्हा एकदा पत्नीसोबत गोविंदाने लग्न करण्यामागे एक खास कारण होते. 

गोविंदाचे लग्न सुनीतासोबत ११ मार्च १९८७ ला झाले होते. सुनीता आणि गोविंदा यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले होते. गोविंदा आणि सुनीता यांना आजही अनेकवेळा एकत्र पाहायला मिळते. गोविंदाच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला सुनीताचे अनेक फोटो पाहायला मिळतात. सुनीता आणि गोविंदा यांनी पुन्हा लग्न का करण्याचा विचार केला हे खूपच इंटरेस्टिंग आहे.

सुनीता आणि गोविंदा यांनी १९८७ मध्ये घरातील अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत मंदिरात लग्न केले होते. हे लग्न त्यांनी सगळ्यांपासून वर्षभर लपवले होते. गोविंदा त्याकाळात अभिनेता म्हणून नुकतेच आपले स्थान निर्माण करत होता. त्यामुळे त्याच्या लग्नाबद्दल त्याच्या फॅन्सला कळले तर त्याच्या महिला चाहत्यांचे प्रमाण कमी होईल असे त्याला वाटत होते. त्यामुळेच त्यांची मोठी मुलगी नम्रताच्या जन्मापर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती. गोविंदा आणि सुनीता यांनी लपूनछपून लग्न केले ही गोष्ट गोविंदाला पटली नव्हती. त्यामुळेच लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला त्यांनी धुमधडाक्यात सगळ्यांच्या उपस्थितीत पुन्हा लग्न केले होते. 

सुनीता आणि गोविंदाची प्रेमकथा देखील खूपच रंजक आहे. सुनीताच्या मोठ्या बहिणीचे गोविंदाच्या मामासोबत झाले होते. त्यामुळे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी सुनीता अनेकवेळा त्यांच्या घरी यायची. ते दोघे त्यावेळी खूपच लहान होते. त्यामुळे ते दोघे प्रचंड भांडायचे. त्या दोघांचा स्वभाव एकमेकांपेक्षा खूपच वेगळा होता. गोविंदाला सुनीता खूपच उद्धट वाटायची.

गोविंदा आणि सुनीता यांना दोघांनाही नृत्याची आवड होती. त्यामुळे गोविंदाचे मामा सुनीता आणि गोविंदाला डान्सची कॉम्पिटिशन करायला सांगायचे. पण सुनीता ही हाय सोसायटीमधील असल्याने गोविंदासोबत स्पर्धा करणे तिला पटत नसे. पण याच भांडणातून त्यांच्यात प्रेम फुलत गेले. त्यावेळी फोनचे प्रमाण खूपच कमी असल्याने ते दोघे एकमेकांना प्रेमपत्र लिहित असत. ही पत्र पोहोचण्याचे काम सुनीताचा भाऊ करत असे. पण एकदा हे पत्र सुनीताच्या आईच्या हातात लागले. त्या पत्रात सुनीताने तिला गोविंदासोबत लवकरात लवकर लग्न करायचे आहे असे लिहिले होते. गोविंदाची आई निर्मिला देवी यांना देखील सुनीता खूप आवडायची. त्यामुळे त्या दोघांच्या घरातल्यांनी लगेचच या लग्नासाठी होकार दिला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Govinda reveals why he remarried wife Sunita at the age of 49 PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.