Govinda in cred club ad going viral on social media fans said hero number 1 is back | गोविंदाचा डान्स व्हिडीओ झाला व्हायरल, फॅन्स म्हणाले - 'परत आला हिरो नंबर १'

गोविंदाचा डान्स व्हिडीओ झाला व्हायरल, फॅन्स म्हणाले - 'परत आला हिरो नंबर १'

गोविंदाची एक जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात गोविंदा एका जिंगलवर परफॉर्मन्स करताना दिसत आहे. जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे की, एका टीमला अभिनेत्याला हायर करायचं आहे आणि त्यासाठी ऑडीशन सुरू आहे.

जाहिरातीचा विषय काहीही असो पण गोविंदाच्या फॅन्ससाठी त्याला स्क्रीनवर बघायला मिळणं ही आनंदाची बाब आहे. गोविंदाच्या या डान्स असलेल्या जाहिरातीला फॅन्सकडून भरभरून प्रेम मिळत आहे. लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत. एका फॅनने सोशल मीडियावर जाहिरात शेअर करत लिहिले की, 'अ‍ॅड नंबर १ आली आहे. काही फरक पडत नाही की, काय सांगताहेत'.

गोविंदा या अ‍ॅडमध्ये पिवळ्या जॅकेटमध्ये आणि ब्राउन पॅंटमध्ये दिसत आहे. एका यूजरने गोविंदाची प्रशंसा करत लिहिले की, 'गोविंदा खरंच कमाल अभिनेता आहे आणि नम्र व्यक्ती आहे. त्याचं मन सोन्याचं आहे. तुम्ही त्याला कोणतीही भूमिका द्या तो सहजपणे करतो. प्रत्येक सीन यादगार करून सोडतो. आपल्या स्माइलने लोकांचं मन जिंकतो'.

दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, 'गोविंदा तू बॉलिवूडच्या सर्वात महान अभिनेत्यांपैकी आणि परफॉर्मरपैकी एक आहे एक अशी व्यक्ती ज्याने आपल्या कॉमिक टायमिंगने शेकडो चेहऱ्यांवर हसू फुलवलं. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Govinda in cred club ad going viral on social media fans said hero number 1 is back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.