कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते.मात्र आता अनलॉक करण्यात आले आहे आणि मालिकांच्या शूटिंगला सुरूवातही झाली आहे. कोरोनाचे संकट पाहता थिएटर उघडण्याचे काही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. घरबसल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अॅमेझॉन प्राईम, डिस्ने हॉटस्टार, नेटफ्लिक्स आता जास्तीत जास्त कंटेंट मिळवण्याच्या मागे लागली आहेत. अशात आता नेटफ्लिक्सवर मोठी घोषणा करण्यात आली. दहा हिंदी चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज केले जाणार आहेत. कोणता सिनेमा कधी रिलीज होईल हे १६ जुलैला समजणार आहे.

डिस्ने हॉटस्टारने काही दिवसांपूर्वी आपल्याकडचे ७ सिनेमे जाहीर केले होते. दिल बेचारा, शकुंतला देवी, लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटांचा समावेश होता. ही घोषणा झाल्यानंतर आता या नेटफ्लिक्सने दहा सिनेमांची यादी जाहीर केली आहे. 

यात एके व्हर्सेस एके, गुंजन सक्सेना, लुडो, डॉली किटी और वह चमकते सितारे, गिन्नी वेडस सनी, तोरबाज, इंदु की जवानी, द गर्ल ऑन द ट्रेन, रात अकेली है, यांसह अनुराग कश्यपच्या एका सिनेमाचा समावेश आहे. कोणता सिनेमा कोणत्या दिवशी रिलीज होईल ते मात्र 16 तारखेला कळणार आहे.


लॉकडाऊन वाढू लागल्यानंतर अनेक चित्रपट निर्माते व दिग्दर्शक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत.डिस्ने हॉटस्टारने सात सिनेमांची घोषणा केली. या वर्षासाठी तब्बल एक हजार कोटींची गुंतवणूक हॉटस्टार करणार असल्याचे वृत्त आहे. आता या स्पर्धेत नेटफ्लिक्सही उतरले आहे. डिस्ने हॉटस्टारने आपल्या सातही सिनेमांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्याची सुरूवात २४ जुलैपासून होणार आहे.

सुशांत सिंग राजपूतची मुख्य भूमिका असलेला मुकेश छाब्रा दिग्दर्शित दिल बेचारा या सिनेमापासून याची सुरूवात होणार आहे. आता हॉटस्टारने आपल्या तारखा जाहीर केल्या असल्याने नेटफ्ललिक्स कोणत्या ताऱखा देते हे पहावे लागेल.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Good News! After Hotstar, there will be 10 movie releases on Netflix now, find out what these movies are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.