तुम्हाला अभिनेत्री रिया सेन आठवतेय ना? तीच रिया जी ‘सिलसिले’ चित्रपटात अश्मीत पटेलसोबतच्या किसेसमुळे चर्चेत आली होती. तिने अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. ती कायम स्वत:ला हॉट आणि सेक्सी दाखवण्यासाठी धडपड करत असते. आता मात्र असे काही झाले की, ती पुन्हा एकदा किसमुळेच चर्चेत आली. पण, हा किस तिला कुणी केलाय हे तुम्ही व्हिडीओतच पाहा...

रिया सेन सध्या आफ्रिका येथे व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. ती एका अभयारण्यात गेलेली दिसत असून तिला चक्क जिराफने ‘फ्रेंच किस’ केल्याचे दिसून येत आहे. रियाच्या ओठांना तो चाटताना दिसतो आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला दिसून येत आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूप आवडल्याचे समजतेय. 

तिच्या प्रोफेशनल कामांबाबत बोलायचे झाल्यास, ती २०१६ मध्ये ‘हिरो ४२०’, ‘डार्क चॉकलेट’ चित्रपटामध्ये दिसली होती. सध्या तिच्याकडे कुठलाही प्रोजेक्ट नाही. याशिवाय ती झंकार बीट्स, अपना सपना मनी मनी या चित्रपटांमध्ये ती दिसली होती.    

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  Giraffe took 'this' actress 'French Kiss'; Video viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.