हाथरस बलात्काराच्या घटनेवर अभिनेत्रींचा संताप, सोशल मीडियावर ट्विट करत व्यक्त केले दुःख

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 12:35 PM2020-10-01T12:35:24+5:302020-10-01T12:39:15+5:30

अत्यंत दुःखद व लज्जास्पद आहे. दोषींना फाशी देण्याची मागणी केली आहे.त्या निष्पाप मुलीची काय चूक होती? दोषींना फाशी देण्यात यावी आणि कुटुंबाला हि लढाई लढण्यासाठी शक्ती व सामर्थ्य मिळावे. ”

Giorgia Andriani: We once again failed as humans in a lowest of the low ways possible | हाथरस बलात्काराच्या घटनेवर अभिनेत्रींचा संताप, सोशल मीडियावर ट्विट करत व्यक्त केले दुःख

हाथरस बलात्काराच्या घटनेवर अभिनेत्रींचा संताप, सोशल मीडियावर ट्विट करत व्यक्त केले दुःख

googlenewsNext

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या बातमीने सर्वत्रच संताप व्यक्त होतोय. जॉर्जिया एंड्रियानी ट्वीट करत आपला राग व्यक्त केला आहे.  अत्यंत दुःखद व लज्जास्पद आहे. दोषींना फाशी देण्याची मागणी केली आहे.त्या निष्पाप मुलीची काय चूक होती? दोषींना फाशी देण्यात यावी आणि कुटुंबाला हि लढाई लढण्यासाठी शक्ती व सामर्थ्य मिळावे. ”

शर्लिन चोप्रा यांनी ट्विट केले की, "बलात्कार करणार्‍यांना फाशीची शिक्षा होऊ द्या. ही अमानवीयता आणि क्रूरपणाबद्दल भारत शून्य सहिष्णुता दर्शवित आहे. मृत्यू दंडहीच शिक्षा द्यायला हवी तेव्हाच कुठे न्याय मिळेल. #हाथरस विक्टिम" .

स्वरा भास्करने ट्विटमध्ये लिहिले की, 'आता वेळ आली आहे की, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या राज्यात कायद्याच्या चिंधड्या उडवल्या जात आहे. त्यांच्या पॉलिसीजने जातीवरून भांडणे सुरू आहेत. खोटे एनकाऊंटर्स होत आहेत, गॅंगवॉर होत आहे आणि उत्तर प्रदेशमध्य बलात्काराची महामारी पसरली आहे. हाथरस केस हे केवळ एक उदाहरण आहे'.

१४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार 

हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.
 

Web Title: Giorgia Andriani: We once again failed as humans in a lowest of the low ways possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.