महाराष्ट्राच्या सुनबाईंनी जपली संस्कृती; मराठमोळ्या रुपात जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 06:10 PM2021-09-14T18:10:59+5:302021-09-14T18:11:13+5:30

Genelia d'souza :

genelia d'souza looks beautiful in traditional attire | महाराष्ट्राच्या सुनबाईंनी जपली संस्कृती; मराठमोळ्या रुपात जिंकली नेटकऱ्यांची मनं

महाराष्ट्राच्या सुनबाईंनी जपली संस्कृती; मराठमोळ्या रुपात जिंकली नेटकऱ्यांची मनं

Next
ठळक मुद्देजेनेलियाने पुन्हा एकदा संस्कृती जपत साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा. कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारी ही जोडी कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यात अनेकदा ते त्यांच्या जीवनातील लहान लहान गोष्टीही फोटो, व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

अलिकडेच रितेशने त्याच्या मुलांचा गणपतीची आरती म्हणतांनाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी रितेश-जेनेलियाने मुलांवर केलेल्या संस्काराचं कौतुक केलं होतं. त्यानंतर आता जेनेलियाने पुन्हा एकदा संस्कृती जपत साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या जेनेलियाने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची सुरेख साडी नेसली असून हातात हिरवा चुडा भरला आहे. इतकंच नाही तर तिने केसात माळलेला गजरा पाहून अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहे.

दरम्यान, जेनेलियाचाहा हा मराठमोळा लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला असून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या ३ तासामध्ये या फोटोला ५ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: genelia d'souza looks beautiful in traditional attire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app