बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा प्रेग्नेंट आहे जुलैमध्ये ती आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. लग्नानंतर गीताने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. यानंतर तिने पहिल्या मुलीला जन्म दिला, आता लवकरच ती पुन्हा एकदा आई होणरा आहे. अलीकडेच गीताने तिच्या करिअरमधून ब्रेक घेतल्यामागचे कारण सांगितले होते. 

एका मुलाखती दरम्यान गीता म्हणाली, 'माझी आई एक वर्किंग मदर होती आणि तिने संपूर्ण कुटुंबाला चांगल्या प्रकारे संभाळले. माझ्याकडे आज जे काही आहे ते तिच्यामुळेच आहे. मी तिच्याकडून प्रेरणा घेत आहे.


 
गीता पुढे म्हणाली, 'आई होणे ही सर्वात सुंदर भावना आहे. मी माझी मुलगी हिनायाबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेते. मला काम करायचे नाही हा माझा वैयक्तिक निर्णय होता.  मी मातृत्वाचा खूप आनंद घेते आहे आणि प्रत्येक टप्प्यावर मी आनंदी आहे. माझ्या बाळाचे पहिले चालणे, तिचे पहिले हसणे आणि तिचा पहिला शब्द असे सर्व सुंदर क्षण मला मिस करायचे नव्हते. ती पुढे म्हणाली की ती पुन्हा कामावर येईल.

गीता एक अभिनेत्री आहे. 2006 मध्ये आलेल्या इमरान हाश्मीचा सिनेमा ‘दिल दिया है’मधून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर 2007 मध्ये ती पुन्हा इमरानसोबत ‘द ट्रेन’मध्ये झळकली होती. हरभजनने गीताला ‘वो अजनबी’ गाण्यात पहिल्यांदा बघितले होते आणि ती त्याला आवडली होती. युवराज सिंगच्या मदतीने त्यांने गीताचा नंबर शोधला. गीताला मेसेज करत तिला कॉफी डेटवर बोलवले होते. गीताने 3 ते 4 दिवस त्याच्या मेसेजचा रिप्लॉय दिला नव्हता. यानंतर दोघांची पहिली भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. 2015 मध्ये हरभजन आणि गीताने मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले होते.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Geeta basra reveals why she never returned to acting after marrying harbhajan singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.