ठळक मुद्देबॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल गौहर खान सलमान खानचा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो ‘बिग बॉस’च्या 7 व्या सीझनची विजेती होती.

अभिनेत्री गौहर खान हिच्यावर आज दु:खाचा डोंगर कोसळला. दीर्घकाळापासून आजारी असलेल्या तिच्या वडिलांचे आज निधन झाले. गेल्या गौहरचे वडील अनेक दिवसांपासून रूग्णालयात भरती होते. आज सकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला.
वडिलांच्या सेवेत गौहरने दिवसरात्र एक केला होता. वडिल बरे व्हावेत, म्हणून ती दिवसरात्र प्रार्थना करत होती. माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा, असे चाहत्यांनाही तिने आवाहन केले होते. पण सगळ्या प्रार्थना व्यर्थ ठरल्यात. आज अखेर गौहरच्या वडिलांची प्राणज्योत मालवली.
गौहरची मैत्रिण प्रीती सिमोस हिने सोशल मीडिया पोस्टद्वारे गौहरच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे.

प्रीतीने गौहरच्या वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘माझ्या गौहरचे वडील, ज्यांच्यावर माझे प्रचंड पे्रम होते. ते अभिमानाने जगले,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले.

गौहर वडिलांची प्रचंड लाडकी होती. गौहरच्या लग्नानंतर काहीच दिवसांत त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते. लग्नानंतर गौहरने वडिलांसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. वडिल आजारी असल्यामुळे गौहर प्रचंड तणावाखाली होती. घर आणि काम मॅनेज करणे तिच्यासाठी कठीण होत होते. पण तरिही पित्याच्या सेवेत तिने स्वत:ला वाहून घेतले होते.  

बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल गौहर खान सलमान खानचा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो ‘बिग बॉस’च्या 7 व्या सीझनची विजेती होती. तिने बॉलिवूडमध्ये रॉकेट सिंग : सेल्समेन आॅफ द इयर चित्रपटातून पदार्पण केले. विद्या बालनच्या ‘ बेगम जान’ या चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात तिने रुबीनाची भूमिका साकारली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: gauahar khan father died preeti simoes shared memory with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.