Funny Moment Taimur Show On During SaiF Ali khan Live Interview During Of Lock down-SRJ | Corona Lockdown: जेव्हा सैफच्या लाइव्ह इंटरव्ह्यूमध्ये अचानक आला तैमुर, अख्या जगाने पाहिल्या त्याच्या बाललीला

Corona Lockdown: जेव्हा सैफच्या लाइव्ह इंटरव्ह्यूमध्ये अचानक आला तैमुर, अख्या जगाने पाहिल्या त्याच्या बाललीला

बॉलीवुडमधील स्टार किड्सपैकी  सर्वाधित त्याचीच चर्चा रंगते. या सगळ्या स्टार किड्समध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा आणि ज्याच्याविषयी प्रत्येकालाच जाणून घ्यायचं तो म्हणजे तैमूर. बॉलीवुडचा छोटे नवाब आणि बेगम करीना यांची जान म्हणजे त्यांचा लेक तैमूर. त्याच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे तैमूरच्या बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतोय. 

लिटील नवाब तैमूर अली खान सोशल मीडियावर अक्षरक्षः धुमाकुळ घालत असतो. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे तैमूर सध्या दिसला नाही. मात्र अशातच जेव्हा डॅडी सैफ अली खान एका खासगी वाहिनीला मुलाखत देत होता. त्याचवेळी अचानक लाईव्ह इटरव्ह्युमध्ये तैमुर आला आणि त्याच्या बाललीला कॅमे-यात कैद झाल्या.  मुलाखतीत अँकरलाही तैमूरला पाहताच त्याला कॅमेरासमोर आणण्यासाठी सैफला सांगितले आणि अँकरच्या सांगण्यावरून सैफने तैमूरलाही फ्रेममध्ये घेतले.

आपल्या क्यूट लुकमुळे चर्चेत असलेला तैमूर सुपरहिरो हल्कचा मास्क आणि ग्लव्स घालून थेट शोचा एक भाग झाला. अँकरने तैमूरला मजेशीर प्रश्नही विचारले. यांत आवाज अचानक कुठून येतोय हे जाणण्याची तैमूरची धडपड सुरू होती. अँकरला तु कुठे आहेस ? असा प्रश्न तैमुर विचारत होता. इतका मजेशीर किस्सा खुद्द सैफनेच त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यानिमित्ताने तैमूर पहिल्यांदाच एखाद्या टीव्ही चॅनलवर लाइव्ह दिसला. आणि त्याला पाहून रसिकही काहीवेळेसाठी रिफ्रेशही झाले.

 मीडियाच्या नजरा कायम तैमूरवर असतात. इतक्या लहान वयातला तो एक सेलिब्रिटी बनला आहे. त्याबाबत आई म्हणून त्याचं बालपण हिरावतं आहे असं वाटतं का? या प्रश्नावर लोकमतला दिलेल्या मुलाखतीत, करिनाने सांगितले होते की,आजचं डिजीटल युग आहे. त्यातच आम्ही कलाकार असल्याने सगळ्यांच्या नजरा तैमूरवर असतात. तरीही तैमूरचे फोटो काढावे असं सगळ्यांना का वाटतं माहिती नाही. मात्र हरकत नाही. तैमूरला कोणत्याही बाळाप्रमाणे आम्ही वाढवत आहोत. त्याचे फोटो काढले जातील म्हणून त्याला बाहेर जाण्यापासून आम्ही रोखू शकत नाही. इतर मुलांसारखं त्यालाही जीवन जगणं गरजेचं आहे. त्याला बाहेर जाण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. त्याचं बालपण कुणीच हिरावून घेऊ शकत नाही.  
 

 

Web Title: Funny Moment Taimur Show On During SaiF Ali khan Live Interview During Of Lock down-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.