बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट सध्या सिनेमांपेक्षा त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. सध्या पुलकित पागलपंती सिनेमाला घेऊन चर्चेत आला आहे. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार एक मुलाखती दरम्यान पुलकित कृती खरबंदाची स्तुती करणे विसरत नाही.  


पुलकित म्हणाला, माझ्या वाईट वेळेत कृतिने मला खूप मदत केली आहे. मी आज पण तोच पुलकित आहे जो आधी होते. मध्ये काही अशा परिस्थिती आल्या होत्या ज्यामुळे मी बदलो होतो. रस्ता चुकत होतो मात्र माझ्या जवळच्या माणसांनी मला यातून बाहेर येण्यासाठी मदत केली.


पुलकितने सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरासोबत लग्न केले होते. नंतर त्यांचा घटस्फोट झाला. पुलकितच्या घटस्फोटाचे कारण यामी गौतम असल्याचे बोलले गेले होते. पुलकित सम्राट कृति खरबंदा नात्यात असल्याची चर्चा अनेकवेळा झाली होती. दोघांना अनेकवेळा स्पॉट करण्यात आले आहे.   
कृति आणि पुलकितची जोडी  वीरे की वेडिंग सिनेमात एकत्र दिसले होते. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.

लवकरच ते अनीस बज्मींच्या पागलपंती सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात पुलकित-कृतिसह जॉन अब्राहम, इलियामा डिक्रूज, अर्शद वारसी आणि उर्वशी रौतला यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या 22 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: fukrey actor pulkit samrat said thanks to actress kriti kharbanda?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.