ठळक मुद्देअक्षय तरीही सुधरेना. शेवटी रागाच्या भरात ट्विंकलने अक्षयसोबतचा साखरपुडा तोडला.

ट्विंकल खन्ना बॉलिवूडमध्ये सक्रीय नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची सक्रीय आहे. आपल्या परखड विधानांमुळे ट्विंकल सतत चर्चेत असते.  17 जानेवारी 2001 रोजी ट्विंकलने अक्षय कुमारसोबत लग्नगाठ बांधली. पण हे लग्न करण्यासाठी अक्षयला बरेच प्रयत्न करावे लागले.
  ट्विंकल खन्नाने एकदा नाही तर  दोनदा एंगेजमेंट केले आहे. अर्थात दोन वेगवेगळ्या नाही तर एकाच व्यक्तीसोबत तिने एंगेजमेट केली. आता हा नेमका मामला काय, ते जाणून घेऊ या.

  ट्विंकल आणि अक्षय रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हाची ही गोष्ट. आधी दोघांचा साखरपुडा झाला.  पण ट्विंकलसोबत साखरपुडा  झाला असताना अक्षय शिल्पा शेट्टीत अडकला. अक्षय व शिल्पाच्या अफेअरच्या बातम्या सगळ्या फिल्मी मॅगझिनमध्ये चवीने चघळल्या जात होत्या. ट्विंकलपर्यंत ही गोष्ट पोहोचली आणि शिल्पा व अक्षयच्या नात्यात मतभेद वाढू लागले. ट्विंकलने अक्षयला तंबी दिली. पण अक्षय तरीही सुधरेना. शेवटी रागाच्या भरात ट्विंकलने अक्षयसोबतचा साखरपुडा तोडला. असे म्हणतात की,  लग्न मोडल्यानंतर ट्विंकल डिप्रेशनमध्येही गेली होती.

कालांतराने अक्षयला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने शिल्पासोबतचे सगळे संबंध तोडले. इतकेच नाही तर ट्विंकलची माफीही मागितली. मग काय, ट्विंकलने अक्षयला माफ केले आणि दोघांचा पुन्हा साखरपुडा झाला.


अर्थात  अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केले होते, तेव्हा तिचा ‘मेला’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर होता. हा चित्रपट हिट झालाच तर लग्नासाठी थांबावे लागले आणि फ्लॉप झाला तर लग्न करू, अशी अट सुरुवातीलाच  ट्विंकल अक्षयपुढे ठेवली होती. पुढे हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपर फ्लॉप ठरला. मग काय, ट्विंकलला अक्षय कुमारशी लग्न करावे लागले.

 

Web Title: Flashback: Twinkle Went To Depression When The Engagement Broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.