First look poster of vicky kaushal starrer film the immortal ashwatthama | The Immortal Ashwatthama First Look: विकी कौशल बनणार अश्वत्थामा, पोस्टरची होतेय चर्चा

The Immortal Ashwatthama First Look: विकी कौशल बनणार अश्वत्थामा, पोस्टरची होतेय चर्चा

विकी कौशलच्या  'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. विकीच्या या सिनेमाची निर्मिती आदित्य धर आणि रॉनी स्क्रूवाला करणार आहेत, या सिनेमात विकी महाभारतातील अमर योद्धा अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे.

 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'च्या फर्स्ट लूकमध्ये  भविष्यातील गगनचुंबी इमारती दिसतायेत बॅकग्राऊंडमध्ये  विकी कौशल अश्वत्थामाच्या रूपात चमकदार तलवार घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. हे पोस्टर्स शेअर करताना विकीने लिहिले की, 'भारावून गेलो आणि खूप आनंद झाला. ‘उरीः द सर्जिकल स्ट्राईक’ची दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही टीम तुम्हाला  'द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ची झलक जगाला दाखवते आहे. आदित्य धर, रॉनी स्क्रूवाला, आरएसव्हीपी मूव्हीज आणि सोनिया कंवर यांच्या ड्रीम टीमसमवेत या प्रवासासाठी मी उत्साहित आहे. '

 

मीडिया रिपोर्टनुसार विकी कौशल अश्वत्थामाच्या भूमिकेसाठी 100 किलोपेक्षा जास्त वजन वाढणार आहे.  तो इज्राइल मार्शल आर्ट आणि जपानी मार्शल आर्ट्स शिकणार आहे. तसेच सिनेमात रॉयल लूक येण्यासाठी तो तलवारबाजी आणि तिरंदाजीचे प्रशिक्षणसुद्धा घेणार आहे. सिनेमाचे शूटिंग युरोपमध्ये सुरु होऊन मुंबईत संपणार आहे. ग्रीनलँड, आइसलँड व्यतिरिक्त इंग्लंड, टोकियो, न्यूझीलंड आणि नामीबिया हेदेखील असतील. 
'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'चे शूटिंग 2021 मध्येच सुरू होणार असल्याची माहिती आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: First look poster of vicky kaushal starrer film the immortal ashwatthama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.