ठळक मुद्देजॅकलिनने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो असून या फोटोत तिने तिच्या डोक्याभोवती स्कार्फ गुंडाळलेला आहे.

बॉलिवूडमधील अनेक स्टार सध्या डिजिटल माध्यमाकडे वळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सैफ अली खान, नवाझुद्दीन सिद्धीकी, आर.माधवन यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक स्टार्सने डिजिटल माध्यमात देखील आपली जादू पसरवली आहे. आता जॅकलिन फर्नांडिस डिजिटल माध्यमात प्रवेश करत असून नेटफ्लिक्सवरील मिसेस. सिरियल किलर या वेबसिरिजमध्ये आपल्याला तिला पाहायला मिळणार आहे.

मिसेस. सिरियल किलर ही वेबसिरिज शिरीष कुंदरने दिग्दर्शित केली असून या वेबसिरिजची निर्माती शिरीषची पत्नी फराह खान आहे. ही वेबसिरिज या वर्षांत आपल्या भेटीस येणार असून या वेबसिरिजबद्दल माहिती देताना नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे की, या वेबसिरिजमधील नायकाला एका गुन्ह्यात अडकवले जाते. त्याने सिरियल मर्डर केले असा आरोप त्याच्यावर लावून त्याला शिक्षा दिली जाते. यानंतर त्याची पत्नी तो निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी सिरियल मर्डर ज्याप्रकारे झालेले असतात, त्याचप्रकारे स्वतः खुन करायला सुरुवात करते. या वेबसिरिजची घोषणा झाल्यापासून या वेबसिरिजमध्ये जॅकलिनचा लूक कसा असणार याबाबत तिच्या फॅन्सना उत्सुकता लागली होती. तिचा लूक कसा असणार याबाबत तिनेच आता सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना सांगितले आहे.

जॅकलिनने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो असून या फोटोत तिने तिच्या डोक्याभोवती स्कार्फ गुंडाळलेला आहे. त्यासोबतच मी नेटफ्लिक्सच्या अतिशय चांगल्या वेबसिरिजचा भाग असून मिसेस. सिरियल किलर मधील माझा हा लूक असणार असल्याचे तिने म्हटले आहे. 

मिसेस. सिरियल किलर या वेबसिरिजमध्ये मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत असणार अल्याची चर्चा रंगली होती. पण जॅकलिनसोबत कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत असणार याबाबत नेटफ्लिक्सने मौन राखणेच पसंत केले आहे. मिसेस. सिरियल किलर या वेबसिरिजविषयी बोलताना फराहने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, चांगल्या कथानकाच्या शोधात असणाऱ्या प्रेक्षकांनासाठी ही वेबसिरिज असून केवळ भारतातील प्रेक्षकच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांना समोर ठेवून ही वेबससिरिज बनवण्यात आली आहे.

Web Title: First Look of Jacqueline Fernandez as Netflix’s Mrs. Serial Killer is Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.